Deadliest cancers might be inside your mouth: कर्करोगासारखा मोठा आणि भयंकर आजार हा अगदीच गंभीर कारणांमुळे होतो असा जर तुमचा समज असेल, तर तो चुकीचा आहे. रोजच्या काही चुकीच्या सवयीदेखील या आजाराला कारणीभूत ठरतात. आपल्या तोंडात असणाऱ्या सूक्ष्म जंतूंचे विशिष्ट कॉम्बिनेशन मानवाला होणाऱ्या सर्वात घातक कर्करोगांपैकी एकाचे कारण ठरू शकतात. तोंडाची स्वच्छता केवळ दात निरोगी राहण्यासाठी म्हणून करू नये, तर संपूर्ण तोंड निरोगी राहण्यासाठी करावी असे यावरून स्पष्ट होते.
“दात घासणे आणि फ्लॉस करणे हे केवळ पिरियोडोन्टल आजार म्हणजे हिरड्यांचे आजार टाळण्यास मदत करू शकत नाही, तर कर्करोगापासून देखील संरक्षण करू शकते”, असे न्यूयॉर्क विद्यापीठातील कर्करोग साथीचे रोगतज्ज्ञ रिचर्ड हेस यांनी सांगितले.
स्वादुपिंडाचा कर्करोग
पॅनक्रिज म्हणजेच स्वादुपिंड हा पोटाचा एक अवयव आहे, जो आपल्या शरीरात अन्नातील पोषक तत्वांचे विघटन आणि शोषण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एन्झाइम आणि हार्मोन्स तयार करण्यासाठी जबाबदार असतो. स्वादुपिंडात फारच क्वचित ट्यूमर विकसित होतात, मात्र ज्यांना हा आजार होतो ते दीर्घकाळ जगण्याची शक्यता तशी दुर्दैवाने कमीच असते.
हेस, एनवाययूमधील शास्त्रज्ञ यिक्सुआन मेंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पन्नास ते सत्तरच्या दशकातील ३ लाखांहून अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या दोन अभ्यासांमधून गोळा केलेल्या आरोग्य नोंदी आणि तोंड धुण्याचे नमुने वापरले.
तोंड धुण्यामध्ये आढळलेल्या २७ प्रकारच्या सूक्ष्म जंतूंचा स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या तिप्पट जोखमीशी संबंध होता. हा आजार अमेरिकेत ५६ पैकी १ पुरूष आणि ६० पैकी १ महिलेला त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी होतो. या टीमच्या निष्कर्षांनुसार आणी मागील एका संशोधनानुसार, आपल्या तोंडातील काही सूक्ष्म जंतू आपल्या लाळेद्वारे पचनसंस्थेत प्रवास करून स्वादुपिंडात प्रवेश करू शकतात. या संशोधनात तोंडातील जंतूंच्या तीन प्रजाती (पोर्फायरोमोनास गिंगिव्हालिस, युबॅक्टेरियम नोडाटम आणि पार्विमोनास मायक्रा) आणि त्वचा आणि आतड्यांमधील एक सामान्य बुरशी, कॅन्डिडा ट्रॉपिकलिस सांगितल्या आहेत. त्या स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या निदानाच्या वाढत्या शक्यतेशी जोडल्या गेल्या आहेत. जंतूंच्या या प्रजातींची पुढची तपासणी आवश्यक आहे हे हेस यांनी स्पष्ट केले. तसंच तोंडाच्या मायक्रोफ्लोराची अचूक रचना आपल्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
यासंबंधित अमेरिकेतली दोन अभ्यासांमधील डेटा वापरून संशोधकांना गोंधळात टाकले. या अभ्यासातील सुमारे ४४५ सहभागींना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला. त्यांच्या डेटाची तुलना ४४५ निरोगी नियंत्रणाशी करण्यात आली. “बॅक्टेरियम वाइड स्कॅनमध्ये आठ तोंडी बॅक्टेरिया कमी होण्याशी संबंधित आणि १३ तोंडी बॅक्टेरिया स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या वाढीव जोखमीशी संबंधित असल्याचे आढळून आले”, असे संशोधकांनी नमूद केले आहे.
स्वादुपिंडाच्या कर्करोगात जगण्याचा दर फक्त १३ टक्के एवढा आहे. याचे कारण म्हणजे अनेकदा याचे निदान वेळेवर होत नाही. हा कर्करोग प्रगत टप्प्यात येईपर्यंत सहसा याची लक्षणे दिसून येत नाहीत, म्हणूनच तोंडाच्या सूक्ष्मजीव रचनेसारखे काही जोखमीचे घटक समजून घेतल्यास याची लक्षणे लवकर ओळखण्यास मदत होऊ शकते. शिवाय तोंडातील बॅक्टेरिया आणि बुरशी आढळणाऱ्या लोकांचे प्रोफाइलिंग करून कर्करोग तज्ज्ञ स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या तपासणीची सर्वात जास्त गरज असलेल्यांना ओळखू शकतील असे डॉ. जियाँग आहन यांनी सांगितले.
दरम्यान, केवळ दात स्वच्छ राहावेत यासाठी प्रयत्न न करता संपूर्ण तोंडाचे आरोग्य कसे राखले जाईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.