Common Foods That Difficult To Digest : आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींचा आरोग्यावर परिणाम होत असतो. दैनंदिन जीवनात आपण खात असलेले बरेच पदार्थ शरीरास पोषक असतात. पण अशाच रोजच्या खाण्यातल्या काही पदार्थांमुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते. खाण्यासाठी हे पदार्थ जरी सामान्य असले तरी यामुळे शरीरावर विपरित परिणाम होतात. त्यामुळे तुम्ही देखील हे पदार्थ खात असाल तर आजचं सावध व्हा. यामुळे बद्धकोष्टता, अपचन, छातीत जळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. जाणून घेऊ हे सामान्य पदार्थ नेमके कोणते आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्बोदके असलेले पदार्थ

पास्ता, पिझ्झा, तांदूळ, बिस्किट, चिप्स, डोनट्स यांसारखे कर्बोदके असलेले पदार्थ अतिशय स्वादिष्ट असतात, हे पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना आवडतात. पण हे पदार्थ पचण्यासाठी फार जड असतात. यामुळे या पदार्थांचे सेवन अतिप्रमाणात झाल्यास पचनक्रियेत बिघाड होतो.

प्रक्रिया केलेले पदार्थ

पिझ्झा, बर्गर आपण आवडीने खात असलो तरी हे प्रक्रिया केलेले पदार्थ आरोग्यासाठी सर्वात वाईट असतात. शून्य पोषणाव्यतिरिक्त प्रक्रिया केलेले हे पदार्थ पचायलाही जड असतात. या पदार्थांच्या सततच्या सेवनामुळे आतड्यांना त्रास होतो. गॅस, पोटदुखी, जळजळ, अॅसिडिटीसारख्या समस्यांना हे प्रक्रिया केलेले पदार्थ कारणीभूत ठरतात.

तळलेले पदार्थ

समोसा, वडापाव हे तळलेले पदार्थ पचन प्रक्रियेला पूर्णपणे हानी पोहचवतात. या पदार्थांमुळे केवळ वजनचं वाढत नाही तर पचायलाही हे पदार्थ जड असतात. अनेकदा हे तळलेले पदार्थ नीट पचत नाही आणि ते आतड्यांमध्ये फिरतात त्यामुळे आतड्यांना सूज येते. यासोबत अतिसाराची समस्या जाणवते. फायबरच्या कमतरतेमुळे बहुतेक तळलेले पदार्थ पचायला जड असतात.

मसालेदार पदार्थ

मसालेदार पदार्थ पचनसंस्थेला चालना देण्यास मदत करतात. परंतु अधिक प्रमाणात हे पदार्थ खाल्ल्यास त्याचा विपरित परिणाम शरीरावर होतो. मसालेदार पदार्थ्यांच्या सेवनाने अनेकांना गॅस, छातीत जळजळ, एॅसिड रिफ्लक्स, मुळव्याध आणि पोटदुखीचा त्रास होतो.

कृत्रिम गोड केलेले पदार्थ

शुगर फ्री फूडमध्ये मोठ्याप्रमाणात आढळणारा कृत्रिम गोड पदार्थ पोटासाठी खूप त्रासदायक असतो. च्युइंगम आणि शुगर फ्री पदार्थांमधील स्वीटनरमुळे गॅस, जळजळ, गोळा येणे आणि अतिसार यासांरख्या समस्या होतात.

मधुमेह, संधिवाताच्या रुग्णांसाठी उंटिणीचे दूध गुणकारी, जाणून घ्या याचे फायदे

अल्कोहोल

अल्कोहोल आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही यामुळे पचनासंबंधीत अनेक आजार होतात. अगदी कमी प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केल्यास एॅसिड रिफ्लक्स, छातीत जळजळ होऊ शकते. यामुळे पोटातील आतड्यांमध्ये जळजळ, पेटके येणे अतिसार यांसारख्या समस्या जाणवू शकतात.

कॉफी, चहा

काही लोक उपाशी पोटी कॉफी, चहाचे सेवन करतात. पण चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असते. ज्यामुळे याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते.

मका

मक्यात मोठ्याप्रमाणात प्रथिनं असतात जे आरोग्यासाठी चांगले असतात. परंतु ते जास्त खाल्ल्याने बद्धकोष्ठतासारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

दुग्धजन्य पदार्थ

प्रत्येकाच्या आहारात हल्ली दुग्धजन्य पदार्थांचा वापर वाढत आहे. मात्र पदार्थांच्या सेवनामुळे गॅसची समस्या उद्भवू शकते. यातील लेक्टोज घटकामुळे हे पदार्थ पचण्यासाठी जड असतात. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थ खायचा असेल तर तुम्ही दही खाऊ शकतात. यात मोठ्याप्रमाणात प्रोबायोटिक्स आढळते जे आतड्यासाठी चांगले असते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, यामुळे अधिकच्या तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This 9 common foods that difficult to digest sjr
First published on: 27-02-2023 at 09:30 IST