मानवी शरीराशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत की, ज्यांचे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. परंतु तरीही आपल्या शरीराशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत; ज्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणं सगळ्यांसाठीच खूप गरजेचं आहे. तर त्यापैकी एक म्हणजे ‘व्हीनस होल्स’ (Venus Hole) आहे. काही लोकांच्या शरीरावर पाठीच्या खालच्या भागात, मणक्याच्या दोन्ही बाजूंना, पेल्विक हाडाच्या अगदी वर ‘व्हीनस होल्स’ म्हणजेच दोन खळ्या आढळून येतात. तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम ॲपवरील एका पोस्टनुसार शरीरावर अशा खळ्या आढळलेल्या व्यक्ती बारीक असतात आणि निरोगी जीवन जगतात, असं सांगण्यात येत आहे. तर खरं आहे की खोटं? याचसंबंधित द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना डॉक्टर श्रेय श्रीवास्तव आणि डॉक्टर संतोष पांडे यांनी सिविस्तर माहिती दिली आहे

‘व्हीनस होल्स’ म्हणजे काय?

‘हेल्थलाइन डॉट कॉम’च्या मते, व्हीनस हे नाव रोमन सौंदर्याची देवी यांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. अनेकांच्या कंबरेवर ‘व्हीनस होल्स’ असतात; ते गालावर असणाऱ्या खळीसारखे दिसतात. परंतु, कंबरेवर या खळ्या असण्याचं कारण काय आहे? आणि त्याला काय म्हणतात? हे फार कमी लोकांना माहीत आहे. तर या खळ्यांना व्हीनस किंवा व्हीनस होल (Venus Hole) म्हणतात. मुंबईच्या ‘रेऊआ एनर्जी सेंटर’चे डॉक्टर संतोष पांडे यांनी सांगितले आहे की, ‘व्हीनस होल्स’ किंवा ‘व्हीनस डिंपल्स’ हे एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील चरबी कमी असल्याचं लक्षण असू शकते. शरीरावर हे छिद्र असणं किंवा नसणं कोणत्याही वैद्यकीय दृष्टीनं महत्त्वाचं नाही; तसेच आरोग्यावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही आणि एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याबद्दल हे ‘व्हीनस होल’ काहीही विशिष्ट सूचित करीत नाहीत.

तसेच एमडी इंटर्नल मेडिसिन (MD Internal Medicine) शारदा हॉस्पिटलचे डॉक्टर श्रेय श्रीवास्तव असे म्हणतात की, शरीरावर पाठीच्या खालच्या भागात असलेल्या या खळ्यांना ‘सामान्य सौंदर्यवर्धक वैशिष्ट्य’ म्हटलं जातं. परंतु, या खळ्यांचे कोणतेही वैद्यकीय परिणाम नाहीत. तसेच ते शरीराला कोणीतही इजा पोहोचवत नाहीत आणि हे सौंदर्याचं लक्षणही मानलं जाऊ शकतं. विशेषत: स्त्रियांमध्ये ‘व्हीनस होल्स’ जास्त प्रमाणात आढळून येतात.

हेही वाचा… VIDEO: बापरे! अशी दहीहंडी कधीच पाहिली नसेल, मडकं धरून बाल्कनित होता उभा, तेवढ्यात गेला तोल, अन्…

‘व्हीनस होल्स’शी संबंधित अफवा :

व्हीनस होल्स हे पाठीवरील एखाद्या खळीप्रमाणे असतात. तसेच व्हीनस होल्स’शी संबंधित अनेक अफवासुद्धा आतापर्यंत पसरवल्या गेल्या आहेत शरीरातील ओटीपोटाच्या रक्ताभिसरण प्रक्रियेसाठी शारीरिक संबंध, वजनावर नियंत्रण मिळवणं अशा गोष्टींसाठी हे एक चांगलं चिन्ह आहे, असं अनेक जण म्हणतात. पण, हे दावे सूचित करणारं कोणतंही संशोधन खरं नाही आणि चांगल्या आरोग्याचा व्हीनस होल्सशी असा कोणताही संबंध नाही, असं डॉक्टर श्रीवास्तव म्हणाले आहेत.

मुंबईचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर पृथ्वीराज देशमुख यांनीही यासंबंधी सांगितलं, “व्हीनस होल हे बहुतेक स्त्रियांच्या कंबरेवर असतात; परंतु कधी कधी ते पुरुषांच्या शरीरावरदेखील आढळतात. शरीरावर जिथे पेल्विस आणि पाठीचा कणा एकत्र येतो, त्या ठिकाणी या खळ्या होतात. या ठिकाणी त्वचा आणि पाठीचा कणा जोडलेले असतात. तसेच काही लोकांमध्ये आनुवंशिकदृष्ट्या व्हीनस होल्स शरीरावर येण्याची शक्यता असते. परिणामी, काही व्यक्ती टॅटूद्वारे व्हीनसच्या खळ्यांवर कॉस्मेटिक प्रक्रियादेखील करू शकतात.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. गरज भासल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)