Symptoms of Vitamin B12 Deficiency: आजकाल व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता अत्यंत सामान्य बाब दिसून येत आहे. व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता प्रामुख्याने शाकाहारी लोकांमध्ये दिसून येते. व्हिटॅमिन बी१२ नसा तयार करण्यास मदत करते आणि शरीराच्या विकासासाठी आवश्यक आहे. व्हिटॅमिन बी१२च्या कमतरतेमुळे शरीरात विविध लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे वेळीच ओळखून कमतरता दूर होण्यास मदत होऊ शकते.

व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेची लक्षणे

व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेमुळे विविध लक्षणे उद्भवू दिसून येतात. ही लक्षणे वेळीच ओळखल्याने समस्येचे निराकरण होण्यास मदत होऊ शकते. व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेमुळे थकवा येऊ शकतो. पुरेशी झोप घेतल्यानंतरही थकवा येणे सामान्य नाही आणि ते व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेचे लक्षण असू शकते.

अशक्तपणा

कोणतेही काम करू न शकणे, अशक्तपणा जाणवणे हेदेखील व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेचे लक्षण असू शकते. याच्या कमतरतेमुळे स्मरणशक्तीवर परिणाम होतो. स्मरणशक्ती कमी होण्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण ते व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेचे प्रमुख लक्षण आहे.

जास्त काळ चहा आणि कॉफीचे सेवन, आतड्यांमधील बॅक्टेरियाचे असंतुलन आणि झोपेचा अभाव यामुळे ही कमतरता होऊ शकते. त्यामुळे कॉफी आणि चहाचे जास्त सेवन टाळा.

व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेवर मात करण्यासाठी काय कराल?

व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेवर मात करण्यासाठी सूर्यफुलाच्या बिया, तीळ, ओमेगा-३, दूध, तूप, मूग, आवळा इत्यादींचा समावेश करा. तुमच्या आहारात या पदार्थांचा समावेश केल्याने व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेवर मात करता येते.

या कमतरतेवर मात करण्यासाठी योग

निरोगी जीवनशैलीचे पालन करणे महत्त्वाचे आहे. याव्यतिरिक्त दररोज सकाळी १० ते १५ मिनिटे उन्हात बसा, चहा आणि कॉफीचे मर्यादित सेवन करा आणि दररोज प्राणायम करा. पुरेशी झोप घ्या. जर तुम्हाला व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.