वजनवाढ ही सध्या सर्वच वयोगटांतील एक मोठी समस्या झाली आहे. वाईट जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि त्यामुळे सतत वाढणारे वजन हे सध्या अगदी तरुण पिढीसमोरही मोठे आव्हान ठरतेय. वाढलेल्या वजनाचा दुष्परिणाम केवळ व्यक्तिमत्त्वावरच न होता, त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यांसारखे गंभीर आजारही होऊ लागले आहेत. तेव्हा निरोगी जीवनशैलीसाठी योग्य आहार आणि व्यायाम यांची जोड असणे अतिशय महत्त्वाचे आहे. आहारामध्ये आपण काय खातो? आणि किती प्रमाणात खातो? याला फार महत्त्व आहे.

निरोगी आहारासाठी कडधान्ये नेहमीच महत्त्वपूर्ण मानली जातात. कडधान्यांमध्ये प्रथिने आणि फायबरसारख्या अनेक पोषक घटकांचा समावेश असतो. डाळींमध्ये समतोल आहार म्हणून बीन्सकडे (सोयाबीन) पाहिले जाते. गेल्या वर्षी १५,१८५ लोकांच्या अभ्यासात असे आढळून आले की, ज्यांनी एका दशकात नियमितपणे बीन्स खाल्ले, त्यांचे वजन कमी झाले आणि त्यांच्या पोटावरील चरबी कमी झाली. अपोलो हॉस्पिटल्सच्या मुख्य पोषणतज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी, बीन्स खाल्ल्याने खरोखरच वजन कमी होऊ शकते का, याच विषयावर माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

This is what happens when you chew cloves everyday
रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
Is Beetroot Really Vegetable Viagra How Eating Beet Helps For Sex Drive
बीट हे भाजीच्या रूपातील Viagra आहे का? सेक्स लाइफशिवाय बीट खाल्ल्याने काय फायदा होऊ शकतो?
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, “फायबरसमृद्ध बीन्स शरीरातून कमी घनतेचे लिपोप्रोटीन (LDL) किंवा खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करतात. फायबरमुळे हृदयरोगाशी संबंधित जळजळदेखील कमी होते. बीन्स खाणे हे रक्तदाब कमी होण्याशीही संबंधित आहे. हे पोटॅशियम, मॅग्नेशियम व कॅल्शियमचे समृद्ध स्रोत आहेत; जे रक्तवाहिन्या रुंद करण्यास मदत करतात. बीन्समधील फायबरमुळे रक्तातील साखरेची वाढ कमी करण्यासही मदत मिळते.”

(हे ही वाचा : गरोदर महिलांनी सनस्क्रीन वापरावे का? डाॅक्टर काय सांगतात… )

ब्लॅक बीन्स हे प्रथिने, कार्बोहायड्रेट्स व फायबरचे उत्कृष्ट स्रोत आहेत. फ्लेव्होनॉइड्स, फोलेट, मँगनीज, मॅग्नेशियम व थायामिन यांसारखे पोषक घटकदेखील काळ्या बीन्समध्ये मुबलक प्रमाणात असतात. ब्लॅक बीन्स कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य मजबूत करतात. त्यातील फायबर रक्तातील एकूण कोलेस्ट्रॉल कमी करते आणि एलडीएल (लो डेन्सिटी लिपोप्रोटीन) कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यासही मदत करू शकते.

बीन्समध्ये फायबर आणि प्रथिने चांगल्या प्रमाणात आढळतात; ज्यामुळे वजन वाढण्यासही मदत होते. बीन्समध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. हे फायबर वजन वाढू देत नाही. बीन्स खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर मिळते. त्यामुळे पचनाचा त्रासदेखील होत नाही. बीन्स खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात बीन्सचा समावेश करायला हवा.