what are the reasons behind whitening of Beard in young age | Loksatta

कमी वयात दाढी पांढरी होण्यामागे ‘ही’ आहेत कारणे, जाणून घ्या उपाय

आता कमी वयाची मुले देखील डाय वापरतात. कमी वयातच दाढीचे केस पाढरे होण्यामागील कारण काय आहे? याबाबत आज आपण जाणून घेऊया.

कमी वयात दाढी पांढरी होण्यामागे ‘ही’ आहेत कारणे, जाणून घ्या उपाय
(pic credit – pixabay)

काळी, दाट, आकारात असलेली दाढी तुम्हाला आकर्षक लूक देऊ शकते. पार्टी, समारंभामध्ये इतरांपेक्षा उठून दिसण्यासाठी अनेक लोक आपल्या दाढीची विशेष काळजी घेतात. परंतु, आता कमी वयातच लोकांची दाढी पाढरी होत आहे. पांढरी दाढी लपवण्यासाठी लोक डाय मारतात. पूर्वी चाळीशी पार केलेले लोक डायचा वापर करत असे. मात्र, आता कमी वयाची मुले देखील डाय वापरतात. कमी वयातच दाढीचे केस पाढरे होण्यामागील कारण काय आहे? याबाबत आज आपण जाणून घेऊया.

दाडीचे केस पांढरे होण्यामागे ही आहेत कारणे

१) तणाव

तणावाने दाढीचे केस पाढरे होऊ शकतात. अतिरिक्त कामामुळे शरीरावर ताण येतो. अशात खाण्यापिण्याकडेही दुर्लक्ष होते, ज्यामुळे ही समस्या उद्भवू शकते. मेलेनिन हे पिगमेंट डोळे, केस आणि त्वचेचे नैसर्गिक रंग आणि चमक टिकवून ठेवण्यात मदत करते. मेलेनिन लिंबूवर्गीय फळांतून, पालेभाज्या आणि बेरी फळांतून मिळते. शरीराला आवश्यक प्रमाणात मेलेनिन मिळाल्यास पांढऱ्या दाढीची समस्या कमी होऊ शकते.

(चहा प्यायल्यानंतर थंड पाणी पिता? होऊ शकतात ‘हे’ ४ नुकसान)

२) मद्यपान आणि धुम्रपान

मद्यपान आणि धुम्रपान देखील कमी वयात दाढी पांढरी होण्याच्या समस्येला कारणीभूत असू शकतात. जास्त धुम्रपान केल्याने रक्तवाहिन्या अंकुचित होऊ लागतात, ज्यामुळे केसांच्या बीजकोशात रक्ताचा नीट प्रवाह होत नाही. यामुळे दाढीचे केस पांढरे होऊ शकतात.

३) अनुवांशिक कारण

कमी वयात दाढीचे केस पांढरे होण्यामागे अनुवांशिक कारण देखील असू शकते. अशा स्थितीत जीवनसत्व क आणि अन्य पोषक तत्व देणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. त्याचबरोबर रोज व्यायाम करा. या उपायांनी दाडी पांढरी होण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकतो.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-11-2022 at 13:48 IST
Next Story
हृदय विकार आणि तुमचे मेटाबॉलिजम सुधारेल ​’हे’ औषधी गुणधर्म; जाणून घ्या अन्य आरोग्यदायी लाभ