हाता, पायांना किंवा शरीरारातील एखाद्या अवयवाला येणारी सूज अनेक जण सामान्य गोष्ट समजतात. पण ही सामान्य समस्या नाही तर हे अनेक गंभीर आजारांचे लक्षण आहे. त्यामुळे भविष्यात कोणत्याही गंभीर आजारांचा सामना करायचा नसेल तर हात, पाय आणि शरीराच्या विविध अवयवांवरील जाणवणाऱ्या सूजेकडे दुर्लक्ष करू नका. कारण सूज ही शरीराची रोगप्रतिकारक शक्तीला अडचण निर्माण करते आणि यामुळे विविध आजार बळावतात. सूज येणाच्या काही सामान्य लक्षणांमध्ये शरीर लालसर होणे, उष्णता किंवा तीव्र वेदना यांचा समावेश आहे. तसेच यामागे काही दीर्घकालीन आरोग्य समस्या देखील असू शकतात. परंतु या समस्येचा सामना करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम शरीराच्या कोणत्या भागावर सूज जाणवते हे समजून घेणे गरजेच आहे. एकूणचं शरीराच्या विविध अवयवांना सूज येण्यामागची कारणं काय आहेत आणि त्यावर कोणते उपाय आहेत यावर आहारतज्ञ अंजली मुखर्जी यांनी एक इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी शरीरावर सूज येण्यामागची ५ सामान्य कारणं सांगितली आहेत. जाणून घेऊ ती कारणं नेमकी काय आहेत…
हाता, पायांना सूज येण्यामागची ‘ही’ आहेत ५ कारणं
१) ताण
ताण हा शारीरिक किंवा भावनिक असू शकतो. कोणत्याही स्वरुपाच्या ताण-तणावामुळे हाता, पायांना सूज जाणवू शकते.
२) प्रदूषण
वाढत्या प्रदुषणामुळे देखील अनेकदा शरीरावर सूज जाणवते. आपण श्वास घेत असलेली हवा आणि पाणी यात अनेकदा प्रदुषक असततात, त्यामुळे शरीरातील आतड्यांना किंवा बाहेर भागावर सूज येते.
३) दुखापत
शारीरिक दुखापत कोणालाही कोणत्याही वेळी होऊ शकते. यात हाता, पायांची हाडं मोडू शकतात. तर अपघातात आपली बोटं जाऊ शकतात, अशा परिस्थितीत आपल्या शरीरावर मोठ्याप्रमाणात सूज दिसून येते.
4) विषाणूचे संक्रमण
एखाद्या विषाणू, जिवाणू, रोगजनक संक्रमणामुळेही शरीरास सूज येते. यात शरीरातीस आतील भागात बुरशीजन्य संक्रमण झाल्यासही अनेकदा शरीरावर किंवा आतड्यांना सूज येते.
5) जुनाट आजार
जर तुम्ही आधीच टाइप २ मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा काही प्रकारच्या संधिवात वेदनांनी ग्रस्त असाल तर तुमच्या शरीरावर वारंवार सूज दिसू शकते.
पोषकतज्ज्ञ अंजली यांनी पुढे म्हटले की, अशा अनेक कारणांमुळे शरीरावर सूज येऊ शकते, यात आपली रोगप्रतिकारशक्ती कमजोर होण्यासह विविध आजार वाढू शकतात. एक उदाहरण देत त्या म्हणाल्या की, संधिवातामध्ये शरीर स्वत:च्या ऊतींवरचं हल्ला करु लागते. हाशिमोटोच्या थायरॉईडायटीसच्या बाबतीतही असेच होते. अशा प्रकारची सूज कालांतराने जुनाट होते आणि ती केवळ सांधे किंवा थायरॉईड ऊतकांवरचं नाही तर शरीराच्या सर्व अवयवांना प्रभावित करते. म्हणून शरीरावर एखादी सूज जाणवत असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. हाता, पायांना सूज जाणवल्यास त्याकडेही दुर्लक्ष करून नका.