Can the Dry January Challenge Reset Your Health Goals : तुम्ही त्यांच्यापैकी एक आहात ज्यांनी ड्राय जानेवारी चॅलेंजसाठी, ज्यामध्ये एक महिना मद्यपान बंद करणे किंवा अधिक माफक प्रमाणात मद्यपान करणे समाविष्ट आहे? तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी हे चॅलेंज स्वीकारत असाल, तर तुम्हाला तात्पुरत्या काळासाठी मद्यपानापासून परावृत्त केल्याने तुमच्या शरीरात होणारे बदल समजून घेणे आवश्यक आहे. कदाचित हे बदल तुम्हाला तुमच्या भावी मद्यपानाच्या सवयीचे स्वरूप ठरवण्यास मदत करतील. यूके चॅरिटी, अल्कोहोल चेंजच्या निर्मात्यांनी अशीच अपेक्षा केली होती.

नियमित मद्यपान केल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो (WHAT HABITUAL DRINKING DOES TO YOUR BODY)

आपल्या सर्वांना माहीत आहे की, नियमित मद्यपानामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. मेंदूचे संज्ञानात्मक कार्य आणि शारीरिक क्षमता बिघडते, ज्यामुळे गोंधळ निर्माण होतो आणि मानसिक चपळता कमी होते. याव्यतिरिक्त झोपेमध्ये व्यत्यय आणतो, चिडचिड आणि थकवा वाढवतो. मद्यपानातून मिळणारा कॅलरीचा अतिरिक्त भार मधुमेह, उच्चरक्तदाब आणि स्वयंप्रतिकार शक्तीचे आजार ( autoimmune diseases) यांसारख्या आधीपासून अस्तित्वातील परिस्थिती आणखी वाढवून आरोग्य विषयक चिंतेत भर टाकतो. याशिवाय यकृताच्या समस्या आणि लठ्ठपणादेखील होतात, ज्याचा तुमच्या एकूण आरोग्यावर लक्षणीय परिणाम होतो. महत्त्वाचे म्हणजे, सतत मद्यपान केल्याने आत्मचिंतन आणि आत्मनिरीक्षण करणे, वैयक्तिक विकासाकडे लक्ष देणे आणि निर्णय घेण्याच्या महत्त्वपूर्ण घटकांसाठी आवश्यक वेळ देता येत नाही.

Vatli Dal Recipe
लाडक्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा स्वादिष्ट वाटली डाळ! लिहून घ्या रेसिपी
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
coconut peel benefits 6 benefits of health from coconut
नारळाची साल फेकताय? थांबा! नारळाच्या सालीपासून आरोग्याला होणारे ‘हे’ ६ फायदे एकदा पाहाच
Ghee tea benefits
खरंच तूपयुक्त कॉफीप्रमाणे तूपयुक्त चहा आहे आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या, तुपाच्या चहाचे फायदे
Bad sleep Routine can increase heart disease risk losing one hour of sleep takes four days to recover
झोपेचं रुटीन बिघडलंय! फक्त एक तासाची कमी झोप तुमच्या आरोग्यासाठी ठरेल धोक्याची घंटा? तज्ज्ञांनी केला खुलासा
Making modak for beloved bappa
लाडक्या बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवत आहात? तज्ज्ञांकडून जाणून घ्या मोदकाचे फायदे
Health centers should be capable of diagnosing cancer
‘कर्करोग निदानासाठी आरोग्य केंद्रे सक्षम हवीत’
Fresh ginger vs dried ginger: Which is better for your health?
ताजे आले की वाळलेले आले? आरोग्यासाठी कोणते फायदेशीर; जाणून घ्या कोणते आले वापरायचे?

“एक महिना मद्यपान न करणे तुमचे यकृत, हृदय आणि रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यासाठी फायदेशीर ठरू शकते,” असे गुरुग्राम येथील मॅरेंगो एशिया हॉस्पिटल्सच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि हेपॅटोबिलरी सायन्स विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. विभोर पारीक यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

हेही वाचा – दूध, दही, बटर, पनीर खाऊन शरीर होतं लठ्ठ? तज्ज्ञांनी सांगितले किती प्रमाणात करावे सेवन?

एका महिन्यासाठी मद्यपान सोडल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो (WHAT GIVING UP ALCOHOL FOR A MONTH DOES TO YOUR BODY)

तुम्हाला सुरुवातीला मद्यपान सोडल्याची काही लक्षणे दिसून येतील. जसे की अनियमित झोप, शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे, चिडचिडेपणा आणि चिंता जाणवू शकते; पण हे तात्पुरते अडथळे आहेत. पार्टी आणि उत्सवाचा आनंद घेताना मद्यपान केल्यानंतर तुमच्या यकृताला विश्रांतीची गरज असते. खूप जास्त मद्यपान केले असल्यास तुमच्या शरीराला बरे होण्यासाठी साधारणपणे चार ते सहा आठवडे लागतात, त्यामुळे संयम तुम्हाला तुमच्या यकृताच्या आरोग्यावर अधिक प्रभावीपणे काम करण्यास आणि अतिरिक्त फॅट्स कमी करण्यास मदत करेल. तुमची झोपेची पद्धत, सुरुवातीला वारंवार लागणाऱ्या उचक्या, नंतर एक आठवडा ते दहा दिवसांत स्थिर होईल. त्यामुळे जर तुम्हाला शांत झोप मिळवण्याचा प्रयत्न करत असाल, तर ड्राय जानेवारी हा सर्वोत्तम मार्ग आहे.

मद्यपान पोटाचे अस्तर खराब करते, म्हणून मद्यपान बंद केल्याने पचन सुधारण्यास मदत होईल.

मद्यपानामधील कॅलरी अतिरिक्त भार आता अन्नाकडे वळवा. त्यामुळे या काळात जर तुम्ही आरोग्यदायी पदार्थ खाल्ले – प्रामुख्याने धान्य (Wholegrains), शेंगा, फळे, हिरव्या पालेभाज्या आणि मांस (Lean meats) खाल्ले आणि हलका व्यायाम केला, तर तुम्ही तुमचा आहार, व्यायाम आणि झोप संतुलित करू शकता.

मद्यपान सोडल्याने तुमच्या शरीराला आवश्यक पाण्याची पातळी जपण्यास मदत होते आणि तुमची डोकेदुखी कमी होऊ शकते. तुमचा रक्तदाब कमी होण्यास सुरुवात होईल. अल्प काळासाठी मद्यपानावर संयम ठेवल्यास केवळ शारीरिक आरोग्यच नाही, तर तणाव-संबंधित समस्याही दूर होतात. तुमची मनःस्थिती आणि एकाग्रता अधिक स्थिर होईल आणि डोकेदुखी कमी होण्याची शक्यता आहे.

अभ्यासातून असे दिसून आले आहे की, “जेव्हा नियमित मद्यपान करणाऱ्यांनी ३० दिवस मद्यपान सोडले, तेव्हा त्यांच्यातील कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर आणि कर्करोगाशी संबंधित प्रथिने कमी झाले.”

हेही वाचा – कॉफीमध्ये चमचाभर तूप मिसळून पितात अनेक सेलिब्रिटी! खरंच ते आपल्या आरोग्यासाठी योग्य आहे का? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या

ड्राय जानेवारीदरम्यान काय करावे? (WHAT TO DO DURING A DRY SPELL?)

निःसंशयपणे मद्यपान करण्याची लालसा तुम्हाला असेल, त्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी तुम्ही भरपूर पाणी आणि द्रव पदार्थ पीत आहात याची खात्री करा. मद्य पिण्याची इच्छा कमी करण्यासाठी फळांचा रस किंवा मॉकटेल ( mocktails) यांसारखी पर्यायी पेये निवडा. नियमित पौष्टिक आहार घ्या. एखादा छंद जोपासा किंवा तुमच्या मनाला आवडेल असा कोणताही नवीन उपक्रम हाती घ्या. मदत करू शकतील अशा तुमच्या वयाच्या मित्रांवर आणि कुटुंबावर विश्वास ठेवा. एक महिना मद्यपान न करणे हे तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.