शरीराच्या सर्व अवयवांच्या योग्य कार्यासाठी अँटिऑक्सिडंट्स खूप महत्वाचे आहेत. काही पदार्थांमध्ये अँटिऑक्सिडंट कंपाउंड्स आढळतात आणि ते शरीरातही तयार होतात. अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स म्हणून ओळखल्या जाणार्‍या अनेक हानिकारक रेणूंपासून शरीराचे रक्षण करतात. कधीकधी काही जुनाट आजारांमुळे क्रॉनिक ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस होण्याचा धोका वाढतो.

तुम्ही तुमच्या रक्तातील अँटिऑक्सिडंट पातळी निरोगी ठेवू शकता आणि काही विशिष्ट अँटिऑक्सिडंट-समृद्ध पदार्थांचे सेवन करून ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे होणार्‍या नुकसानापासून स्वतःचे संरक्षण करू शकता. यासोबतच हे पदार्थ रोगप्रतिकारशक्तीही मजबूत करतात. अँटिऑक्सिडेंट्स युक्त पदार्थांचे सेवन करण्याचे कोणकोणते फायदे आहेत, हे आज आपण जाणून घेऊया.

मंदिरात घंटा वाजवण्याचे खरे कारण तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या याची वैज्ञानिक बाजू

  • एका अहवालानुसार, ज्या अँटीऑक्सिडंट्समध्ये कार्डिओप्रोटेक्टिव्ह अ‍ॅक्टिव्हिटीज असतात, ते व्हिटॅमिन सी, ई, सेलेनियम, जस्त, तांबे यांनी समृद्ध असतात. ते तुमचे हृदयरोगांपासून संरक्षण करतात आणि हृदयाचे आरोग्य सुधारतात.
  • अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले अन्न सेवन केल्याने संज्ञानात्मक आरोग्य देखील चांगले राहते. त्यामुळे स्मृतिभ्रंश, स्मरणशक्ती कमी होणे अशा समस्या उद्भवत नाहीत. त्यांचे सेवन केल्याने, मेंदू निरोगी राहतो, त्याचे कार्य योग्यरित्या पार पाडते आणि मज्जासंस्था अधिक चांगल्या प्रकारे कार्य करते.
  • अँटिऑक्सिडंट्स भरपूर असलेल्या पदार्थांचे नियमित सेवन केल्यास संधिवात होण्याची शक्यता कमी असते.
  • ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन नावाचे अँटिऑक्सिडंट वयाशी संबंधित मॅक्युलर डिजेनेरेशनपासून संरक्षण करतात, तसेच इतर दृष्टी-संबंधित समस्या टाळतात.
  • अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले पदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि वयोमान वाढण्यासही मदत होते.
  • अँटिऑक्सिडंट्स असलेले अन्न तुमचे यकृताचे कार्य सुधारू शकतात आणि यकृताच्या आजारांपासून संरक्षण करू शकतात.

Weight Loss Tips : गोड पदार्थ न सोडताही वजन कमी करता येणार; फॉलो करा ‘या’ टिप्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अँटिऑक्सिडंट्स समृद्ध अन्न

  • अक्रोड, पेकान, चेस्टनट सारखा सुका मेवा
  • स्ट्रॉबेरी, गुजबेरी, रास्पबेरी, ब्लूबेरी
  • लाल किंवा जांभळा कोबी
  • सोयाबीन, ब्लॅक बीन्स
  • डार्क चॉकलेट्स
  • लाल, काळी, हिरवी द्राक्षे
  • विविध प्रकारच्या डाळी
  • हिरव्या पालेभाज्या
  • बीट, ब्रोकोली, रताळे
  • गाजर, ग्रीन टी, कॉफी
  • सफरचंद, टोमॅटो, डाळिंब, द्राक्षाचा रस
  • मसाले आणि औषधी वनस्पती इत्यादींमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)