दिवाळी हा निश्चितच आनंदाचा सण आहे; पण त्यासोबत येणाऱ्या अनेक सणांमुळे गोड पदार्थांचे प्रमाण स्वाभाविकपणे वाढते.मग असे अधिक गोड पदार्थांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. बऱ्याचदा लोक उत्साहामध्ये जास्त प्रमाणात गोड पदार्थ खातात, ज्यामुळे पचन, रक्तातील साखर आणि वजनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणूनच या दिवाळीत तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी काही सोपे उपाय महत्त्वाचे आहेत. दिवाळीदरम्यान तुमचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आम्ही तुम्हाला ८ प्रभावी टिप्स शेअर करीत आहोत, जेणेकरून तुम्ही सणाचा आनंद तर घेऊ शकाल आणि तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणामही होणार नाही.

१. मिठाईवर नियंत्रण ठेवा

दिवाळीच्या काळात घरात विविध प्रकारचे गोड पदार्थ जमा झालेले असतात. त्यामुळे त्या कालावधीत स्वतःवर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. तेव्हा जास्त गोड पदार्थ खाण्याऐवजी, फक्त एक किंवा दोन गोड पदार्थ खाणे पुरेसे आहे. त्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहील आणि तुमच्या पचनक्रियेवर कोणताही ताण येणार नाही.

२. नियमित आहार घ्या

सणांच्या गर्दीत, लोक अनेकदा जेवण वगळतात किंवा वेळेवर जेवत नाहीत. निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार आवश्यक आहे. प्रत्येक जेवणात प्रथिने, फळे, भाज्या आणि फायबरचा समावेश करा. नियमित जेवण केल्याने तुमची ऊर्जा पातळी टिकून राहते आणि गोड पदार्थांची इच्छा कमी होते.

३. भरपूर पाणी प्या

दिवाळीत गोड पदार्थ आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते. पोटफुगी टाळण्यासाठी हलके, निरोगी पदार्थ खा आणि दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी प्या. पाण्यामुळे चयापचय सुधारते आणि शरीर हायड्रेट राहते.

४. अति खाणे टाळा

सणांच्या काळात घरी पाहुण्यांसोबत जेवताना लोक जास्त जेवतात. हे टाळण्यासाठी तुमच्या पोटाच्या मर्यादा जाणून घ्या. तुमचे अन्न हळूहळू चावून खा आणि आवश्यकता नसल्यास अतिरिक्त जेवण टाळा. त्यामुळे पचन सुरळीत राहते आणि तुमचे वजन नियंत्रणात राहते.

५. वर्कआउट करीत राहा


दिवाळीची तयारी करताना घराची साफसफाई, खरेदी आणि सजावट करण्यात बराच वेळ जातो. तरीही दररोज थोडीशी कसरत करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सणामध्ये ग्रहण केलेल्या अतिरिक्त कॅलरीज बर्न होण्यास मदत होते आणि शरीर तंदुरुस्त राहते.

६. रक्तदाब आणि ग्लुकोजची पातळी नियंत्रणात ठेवा.


सणासुदीच्या जेवणात गोड पदार्थ, तळलेले पदार्थ आणि कधी कधी अल्कोहोलचे सेवन केले जाते. त्यामुळे रक्तदाब आणि ग्लुकोजच्या पातळीत असंतुलन निर्माण होऊ शकते. म्हणून या दिवसांमध्ये नियमितपणे तुमचा रक्तदाब आणि साखर तपासा.

७. मानसिक स्वास्थ्यावर लक्ष द्या

दिवाळीच्या तयारीदरम्यान मानसिक ताण खूप वाढतो. घराची साफसफाई, खरेदी, सजावट यांमुळे ताण येतो. म्हणून दिवसभर खोल श्वास घ्या, थोडे ध्यान करा आणि मानसिक ताण कमी करा.

८. पुरेशी झोप घ्या

सणाच्या दिवशी रात्री साजरे केले जाणारे उत्सव आणि त्यासाठी केली जाणारी दिवसभराची तयारी यांमुळे शरीर खूप थकते. दररोज किमान सात-आठ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. चांगली झोप घेतल्याने शरीराची ऊर्जा टिकून राहते, मानसिक आरोग्य सुधारते आणि दिवाळीचा आनंदही वाढतो.

जर तुम्ही २०२५ च्या दिवाळीसाठी वरील आठ उपाय फॉलो केलेत, तर तुम्ही सणाचा आनंद घेऊ शकालच; पण निरोगी आणि तंदुरुस्तही राहाल. गोड पदार्थांचा आस्वाद घेताना तुमच्या शरीराची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. या सणादरम्यान तुमच्या आरोग्याचे योग्य व्यवस्थापन करून तुम्ही दिवाळीचा खरा आनंद अनुभवू शकता.