Heart Attack Cause : जेव्हा बहुतेक लोक हृदयविकाराचा विचार करतात तेव्हा ते सर्वांत आधी तळलेले पदार्थ लक्षात घेतात. परंतु डॉक्टरांच्या मते, केवळ तळलेले पदार्थच नाही, तर काही इतर सामान्य पदार्थदेखील हृदयरोगाच्या वाढीव जोखमीशी जोडलेले आहेत.अलीकडच्या एका आरोग्यविषयक अहवालात असे काही अन्नपदार्थ उघड झाले आहेत, ज्यांचे नियमित सेवन केल्याने शरीरात ब्लॉकेज तयार होऊन हृदयाला जाणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होतो, आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.कोणते पदार्थ हृदयविकाराचा धोका वाढवू शकतात ते जाणून घेऊया…

अशातच महिला अनेकदा जेवण बनवताना मोठी चूक करतात, ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. अनेकदा महिला स्वयंपाक करताना एका पदार्थासाठी वापरलेलं तेल पुन्हा दुसरा पदार्थ बनवतानाही वापरतात. बऱ्याचदा हे तेल दिवसेंदिवस तसेच पडून असते आणि त्यानंतर पुन्हा त्याचा वापर केला जातो. वापरलेल्या तेलापासून बनवलेले समोसे, पकोडे, पुरी किंवा फ्रेंच फ्राईजमध्ये ट्रान्स फॅट्स असतात, जे रक्तवाहिन्या ब्लॉक करतात. त्यामुळे यापुढे महिलांनो, एकदा वापरलेलं तेल पुन्हा वापरू नका.

तसेच इतर कोणते पदार्थ आहेत ज्यानं हार्ट अटॅकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो, याबद्दल जाणून घेऊयात.

सॉसेज, सलामी, कबाब किंवा इतर चरबीयुक्त मांसासारख्या पदार्थांमध्ये सोडियम आणि संतृप्त चरबीचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

पांढरा ब्रेड, बिस्किटे, पफ, नान किंवा पाव यांसारखे पदार्थ रक्तातील साखरेची पातळी जलद वाढवतात.

कोला, एनर्जी ड्रिंक्स, पॅकबंद फळे किंवा फ्लेवर्ड लस्सी हे हृदयरोगास कारणीभूत ठरणारे जोखमीचे खाद्यपदार्थ आहेत.

इन्स्टंट नूडल्स, तयार पदार्थ, गोठलेले पराठे किंवा सॉस यांसारख्या पदार्थांमध्ये लपलेली चरबी साखरेचे प्रमाण जलद गतीने वाढवतात.

असे पदार्थ खाल्ल्याने हृदयाला हानी पोहोचू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांनी सांगितले की, अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थांमुळे प्रत्येक सर्व्हिंगमध्ये हृदयविकाराचा धोका सुमारे सात टक्क्यांनी वाढतो.

हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी शक्य तितके घरी शिजवलेले जेवण खा आणि ताज्या भाज्या, फळे, डाळी व संपूर्ण धान्ये यांचे सेवन वाढवा. साखरयुक्त किंवा प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे दररोजचे सेवन शक्य तितके मर्यादित करा.