Reusing of used cooking oil: आजकाल सर्व घरात स्वयंपाकासाठी तेलाचा वापर वेगाने वाढत आहे. बऱ्याच घरांत पुरी, भजी किंवा एखादे तळण केल्यानंतर उरलेले तेल परत वापरले जाते, तेलाचा हा पुनर्वापर सामान्य आहे. जवळजवळ प्रत्येक घरातील लोक उरलेले स्वयंपाकाचे तेल वापरतात. काही तळण्यासाठी वापरलेले तेल नंतर लोक भाजी, पराठे किंवा इतर कोणत्याही पदार्थ तयार करण्यासाठी वापरतात. पण दुसरा पदार्थ तयार करण्यासाठी एकदा वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर करणे हे खूप हानिकारक ठरू शकते. खरंतर एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरण्यामुळे आपल्या आरोग्याचे नुकसान होते. बरेच लोक स्वयंपाकासाठी मोहरीचे तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा रिफाइंड तेल वापरतात परंतु ते वापरण्याची योग्य पद्धत माहित नसते.

स्वयंपाक तेल वापरण्यासाठी विविध पद्धती आहेत. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की, स्वयंपाकाचे तेल जास्त वेळ शिजवणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

पोटाचे आजार

उरलेल्या तेलाचा वारंवार पुनर्वापर केल्यास पोटाच्या समस्या वाढू शकतात. वापरलेले तेल पुन्हा वापरल्याने, तुम्हाला अल्सर, ॲसिडिटी, जळजळ असे अनेक त्रास होऊ शकतात. एवढेच नव्हे तर उरलेल्या तेलाचा वापर आपल्या पचनासाठीही चांगला नसतो. यामुळे अपचन, बद्धकोष्ठता आणि जुलाब यासारख्या समस्याही उद्भवू शकतात.

मधुमेह आणि लठ्ठपणा

तळणानंतर उरलेले तेल पुन्हा वापरल्याने लठ्ठपणाही होऊ शकतो. एवढेच नाही तर उरलेल्या तेलापासून बनवलेले अन्न सेवन केले तर मधुमेहाचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे वापरलेले तेल पुन्हा वापरणे शक्य तितके टाळावे

फॅटी ऍसिडमुळे नुकसान होते

तेलामध्ये फॅट असते हे फार कमी लोकांना माहीत आहे. जर तुम्ही तेल वारंवार गरम करून ते वापरत असाल तर ते आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे तेच तेल पुन्हा पुन्हा वापरणे योग्य नाही.

हेही वाचा >> Kitchen Jugaad Video: साबणाऐवजी हिरव्या मिरचीने धुवा कपडे; विचित्र उपायाचा चमत्कारिक परिणाम

सर्व काही एकाच वेळी तळू नका

अनेकांना तेल पुन्हा पुन्हा गरम करून ते वापरण्याची सवय असते. त्याच पॅनमध्ये पुन्हा पुन्हा तळू नका. तुम्हीही असे करत असाल तर सावध व्हा कारण हे अनेक आजारांचे लक्षण असू शकते. जर तुम्ही एक किंवा दोनदा तेल वापरत असाल तर या टिप्स लक्षात ठेवा. वापरलेले तेल थंड झाल्यावर गाळून घ्या आणि मग हवाबंद डब्यात ठेवा. असे केल्याने तेलात राहिलेले अन्नाचे कण निघून जातील. हे तेल तुम्ही पुन्हा शिजवण्यासाठी वापरू शकता.