बिघडलेली जीवनशैली आणि आहारामुळे वृद्धांच्या बरोबरीने तरुणांमध्येही मधुमेहाचा धोका वाढत आहे. एकदा तुम्हाला मधुमेह झाला की त्यावर निश्चित इलाज नाही, पण तुमच्या जीवनशैलीत काही गोष्टींचा समावेश करून शुगर नियंत्रणात ठेवता येऊ शकतं. आज आम्ही तुम्हाला काही व्यायामांबद्दल सांगणार आहोत जे ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?

डॉ. ऋषभ शर्मा यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये मार्गदर्शन केलं आहे. ते म्हणतात, “मधुमेहाच्या रुग्णांसाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. कारण दररोज व्यायाम केल्याने शरीरात इन्सुलिन तयार होते आणि ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. दररोज व्यायाम केल्याने शरीरातील रक्तप्रवाहही व्यवस्थित राहतो. म्हणूनच चालणं हा सर्वोत्तम व्यायाम मानला जातो. कारण याद्वारे रक्त शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचतं. तसंच, याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो पूर्णपणे मोफत आहे.”

बागकाम: बागकाम हा एक व्यायाम आहे जो तुमच्या शरीराला खूप फायदे होतात. कारण तुमच्या सांध्यांवर खूप ताण येत असतो. तुम्ही अनेकदा उठता-बसता किंवा खड्डा खोदता. या सर्व अ‍ॅक्टिव्हिटीज एरोबिक्स प्रकारच्या अ‍ॅक्टिव्हिटीज आहेत. यामुळे तुमची ताकद टिकून राहते. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे झाडांसोबत राहिल्याने तुमची तणावाची पातळी कमी होते.

योग आणि प्राणायाम: या दोन्ही गोष्टी केल्याने तुमचा लठ्ठपणा, ब्लड शुगर लेव्हल बऱ्याचदा नियंत्रित राहते. यामुळे तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. लक्षात ठेवण्यासारकी गोष्ट म्हणजे, तुम्ही नेहमी योग्य योग शिक्षकाकडून शिकून घेतलं पाहिजे. कारण चुकीचा योग करून उपयोग नाही.

पायऱ्या चढणे वगैरे : घराच्या किंवा ऑफिसच्या पायऱ्या चढण्यानेही रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार होते. ज्यामुळे तुमची ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहते. पण ज्या रुग्णांना सांधेदुखी किंवा कोणतीही समस्या असेल त्यांनी हा व्यायाम अजिबात करू नये. कारण त्याचा तुमच्या सांध्यांवर खूप प्रभाव पडतो आणि अनेक वेळा असं करण्यात आणखी त्रास होऊ शकतो.

सायकलिंग: सायकलिंग केल्याने तुमच्या शरीरातील खालच्या भागाचे अवयव सतत काम करत असतात. त्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तदाबाची पातळी नियंत्रित राहते. यामुळेच शरीराला इन्सुलिन तयार करणे खूप सोपे होते. दिवसातून किमान १० मिनिटे सायकल चालवण्याचा प्रयत्न करा.