युरिक अॅसिडचे प्रमाण वाढणे हे खराब जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे होते. युरिक अॅसिड हे प्रत्येकाच्या शरीरात तयार होणारे रसायन आहे. मूत्रपिंड ते फिल्टर करते आणि लघवीद्वारे युरिक ॲसिड शरीराबाहेर टाकते. जर त्याची पातळी वाढली तर मूत्रपिंडांना ते फिल्टर करणे आणि शरीराबाहेर टाकणे कठीण होते. मेयो क्लिनिकच्या अभ्यासानुसार, “जगभरातील पाचपैकी एका व्यक्तीमध्ये युरिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते.”
युरिक अॅसिडचे प्रमाण वाढण्यास अनेक घटक कारणीभूत असतात, ज्यात लठ्ठपणा, प्युरिन जास्त असलेले पदार्थ खाणे, मद्यपान, अनुवांशिक समस्या, हायपोथायरॉईडीझम, मूत्रपिंडाचे कार्य कमी होणे आणि मूत्रपिंड निकामी होणे यांचा समावेश आहे.
यूरिक ॲसिडला मिलीग्रॅम (mg) आणि रक्ताला डिकिलीटर( (dL) या एककमध्ये मोजले जाते. महिला आणि पुरुषांमध्ये यूरिक अॅसिडची पातळी वेगवेगळी असते. चला जाणून घेऊ या, महिला अन् पुरुषांमध्ये किती यूरिक अॅसिडची पातळी किती असावी आणि वाढलेली युरीक ॲसिड पातळी कशी नियंत्रित करावी.
महिला अन् पुरुषांमध्ये किती असले पाहिजे यूरिक ॲसिड
महिलांमध्ये यूरिक ॲसिडचे सामान्य पातळी २.४ ते ६.० mg/dL आणि पुरुषांमध्ये ३.४ ते ७.० mg/dL असली पाहिजे. यूरिक ॲसिड सर्वांच्या शरीरामध्ये तयार होते आणि मुत्रपिंड ते फिल्टर करून ते सहज शरीराबाहेर काढून टाकते. पण शरीरात यूरिक अॅसिडची पातळी जास्त होणे त्रासदायक ठरू शकते.
युरिक अॅसिडच्या वाढत्या पातळीचे वैज्ञानिक नाव हायपरयुरिसेमिया आहे. रक्तातील युरिक अॅसिडची पातळी वाढल्याने शरीरात त्याचे स्फटिक तयार होतात, ज्यामुळे बोटांच्या आणि पायांच्या सांध्यामध्ये वेदना होण्याची तक्रार होते.
युरिक अॅसिड का वाढते: आहारात मटण, गोमांस किंवा बकरीचे यकृत यासारखे उच्च प्रथिनेयुक्त आहार घेतल्याने युरिक अॅसिडची पातळी झपाट्याने वाढते. उपवास किंवा पुन्हा आहार घेतल्यानेही युरिक अॅसिडची पातळी वाढू लागते. मूत्रपिंडात समस्या असल्यासही युरिक अॅसिड वाढू शकते.
युरिक अॅसिड वाढल्यास काय होते?
युरिक अॅसिडची पातळी वाढल्यास जास्त पाणी प्या. जेव्हा आपण जास्त पाणी पितो तेव्हा लघवीची प्रक्रिया वाढते आणि शरीरातून जास्त प्रमाणात युरिक अॅसिड बाहेर पडते. प्युरिनयुक्त पदार्थ टाळा. रिफाइंड आणि प्रोसेस्ड फूड युरिक अॅसिड वाढवतात.
युरिक अॅसिड कमी करण्यासाठी आहारात फळे खा. फळांमध्ये सफरचंद, स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी ही युरिक अॅसिड नियंत्रित करणारी सर्वोत्तम फळे आहेत. युरिक अॅसिड नियंत्रित करण्यासाठ ॲपल साईडर व्हिनेगरचे सेवन करा.
नियमित व्यायाम आणि योगा देखील युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवतात.