Holika Dahan 2022 Timing: होळी हा सण हिंदू धर्मात विशेष मानला जातो. कारण होळीच्या दिवशी असत्यावर सत्याचा विजय झाला. म्हणूनच लोक मिठी मारून आणि रंग लावून सण साजरा करतात. हिंदू कॅलेंडरनुसार, होळीचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. त्यामुळे यंदा होलिका दहन आज अर्थात १७ मार्चला होणार असून धुलीवंदन १८ मार्चला साजरी होणार आहे. चला जाणून घेऊया, होलिका दहनाचा शुभ मुहूर्त…

वेळ आणि तारीख

फाल्गुन पौर्णिमा तिथीची सुरुवात: १७ मार्च, दिवस गुरुवार, दुपारी ०१:२९ वाजता

फाल्गुन पौर्णिमा तिथीची समाप्ती: १८ मार्च, शुक्रवार दुपारी १२.४७ वाजता

(हे ही वाचा: Holi 2022 : होळीसाठी घरीच बनवा हर्बल रंग; जाणून घ्या पद्धत)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

होलिका दहन शुभ मुहूर्त

यंदा होलिका दहन गुरुवारी १७ मार्च रोजी आहे. म्हणजे १७ मार्च रोजी होलिका दहनाची वेळ रात्री ९.६ ते १०.१६ पर्यंत आहे. ज्यांना भाद्र नंतर होलिका दहन करायचे असेल तर त्यांच्यासाठी मुहूर्त रात्री उशिरा १.१२ ते १८ मार्च रोजी सकाळी ६.२८ पर्यंत आहे.