आजकाल बाजारात चांगल्या भाज्या मिळणे फार अवघड झाले आहे. भाज्यांवर औषधांची फवारणी केली जाते त्यामुळे सर्व भाज्या धूवून साफ करूनच घ्याव्या लागतात. काही भाज्यांमध्ये अळी किंवा किडे होतात त्यामुळे खरेदी करताना भाज्या काळजीपूर्वक खरेदी कराव्या लागतात. काही भाज्या अशा असतात ज्या वरवर चांगल्या दिसतात पण आतमध्ये अळी किंवा किडे दडलेले असतात. अशीच एक भाजी म्हणजे फुलकोबी. फुलकोबी वरून कितीही पांढरा शुभ्र दिसत असला म्हणजे तो चांगला आहे असे नाही. बाजारातून आणलेला फुलकोबी खाण्यापूर्वी व्यवस्थित साऱ करावा लागतो कारण त्याच्या आतमध्ये बारीक किडे अथवा अळी असू शकते.
सहसा बाजारातून आणलेला फुलकोबीची भाजी करण्यापूर्वी तो गरम पाण्यात उकळवला जातो जेणेकरून त्यात किडे किंवा अळ्या असतील तर बाहेर येतील. पण आज येथे आणखी एक सोपी ट्रिक सांगणार आहोत ज्याच्या मदतीने फुलकोबीमधील बारीक किडे आणि अळी झटक्यात बाहेर येईल.
बाजारातून आणलेला फ्लॉवर तुम्हाला जर फ्रिजमध्ये ठेवायचा असेल तेव्हा इतर भाज्या खराब होऊ नये म्हणून ही ट्रिक उपयोगी ठरू शकते. सर्व प्रथम फ्लॉवरचे पाने काढून टाका. त्यानंतर हिरवा देठ तसाच राहू द्या. आता फक्त काही सेंकद गॅसवर फुलकोबी ठेवा जेणेकरून तो गरम होईल आणि उष्णतेने त्यामध्ये दडलेले किडे अथवा अळी झटक्यात बाहेर येईल. त्यानंतर तुम्ही हा फुलकोबी फ्रिजमध्ये ठेवू शकता.
हेही वाचा – Video : कोमट पाण्यात कांदा ठेवा अन् पाहा कमाल! भन्नाट किचन टिप्स वापरून बघा
ही ट्रिक Maa, yeh kaise karun? नावाच्या युट्यूबवर पोस्ट केला आहे. ही ट्रिक उपयोगी आहे का हे स्वत: वापरून ठरवा.