Amazing Benefits of Eating Sago : नवरात्रीच्या उपवासासाठी कित्येक लोक साबूदाना खातात. साबुदान्याची खिचडी, थालपीट, भजी, किंवा खीर असे पदार्थ तयार करून उपवासादरम्यान खाल्ले जातात. पण साबूदाना कसा तयार केला जातो? साबुदान्याचे उत्पादन सर्वाधिक कोणत्या ठिकाणी होते? साबुदानाचे सेवन केल्याने शरीराला कोणते फायदे होतात याबाबत तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊ या सविस्तर
साबुदाना कोणत्या वनस्पतीपासून तयार केला जातो?
टॅपिओका (Tapioca) म्हणजेच साबुदाणा होय, जो कसावा (Cassava) वनस्पतीच्या कंदमुळांपासून काढलेल्या स्टार्चपासून बनतो. या वनस्पतीला सागो असेही म्हणतात. सागो हे रताळ्यासारख्या दिसणारे कंदमूळ आहे. ब्राझील, अमेरिका, एशिया शिवाय जगभरात अनेक देशांमध्ये सागोचा वापर केला जातो. युरोपमधील काही भागांमध्ये या कासावा नावाने ओळखले जाते तर जगभरात त्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.
कसा तयार केला जातो साबूदाना?
सागो किंवा टॅपिओकाच्या पिकाची लागवड चांगली पूर्ण झाल्यानंतर त्याचे पिकाची छाटनी करून कंदमूळ काढले जाते. हे कंदमूळ चांगले स्वच्छ करून बारीक केले जाते जे दिसायला दूधासारखे दिसते. त्यातून पांढऱ्या रंगाचे स्टॉर्च वेगळे केले जाते.त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून गरम केले जाते आणि त्यानंतर मशीनमध्ये दाणेदार आकार दिला जातो त्यानंतर साबुदाणा स्वरुप मिळते.
भारतात कोणत्या ठिकाणी साबुदाणाचे पिक घेतले जाते?
भारतात केरळमध्ये सर्वाधिक प्रमाणात साबुदाण्याची शेती केली जाते. त्याशिवाय तामिळनाडूमध्ये देखील हे पीक घेतले जाते. मल्याळम भाषेत साबुदान्याला कप्पा असे म्हणतात.
साबुदाना भारतात कसे पोहोचला?
१८८०-१८८५ पर्यंत, त्रावणकोरमध्ये तीव्र दुष्काळ पडला ज्यामुळे अन्न आणि पेयाची कमतरता निर्माण झाली. अशा परिस्थितीत, त्रावणकोरचे तत्कालीन महाराजा विशाखम थिरुनल राम वर्मा यांनी त्यांच्या सल्लागारांना पर्यायी अन्नपदार्थांची व्यवस्था करण्यास सांगितले. त्यानंतर, भाताला पर्याय म्हणून साबुदाणे सादर केले गेले. नंतर ते संपूर्ण भारतात लोकप्रिय झाले.
साबुदाण्याचे फायदे
साबुदाणा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याचेही म्हटले जाते. त्यात फायबर, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण चांगले असते जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
- १ लोह: साबुदाण्यात लोहाचे प्रमाण चांगले असते जे लाल रक्तपेशींच्या निर्मितीस मदत करते. यासह अशक्तपणा निर्माण करणाऱ्या आजारापासूनही मुक्तता मिळू शकते.
- २ उच्च रक्तदाब: साबुदाण्यात पोटॅशियम भरपूर असते जे उच्च रक्तदाबावर उपचार करण्यासाठी वापरले जाऊ शकते.
- ३ हाडांसाठी: कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन-के हाडांसाठी अत्यंत फायदेशीर आहेत आणि हे सर्व गुण साबुदाण्यात चांगल्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे, ते हाडांसाठी फायदेशीर ठरू शकते.
- ४ फायबर: साबुदाण्यात आहारातील फायबर मोठ्या प्रमाणात आढळते, ज्याचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात.
- ५ प्रथिने: शाकाहारी लोक प्रथिनांसाठी त्यांच्या आहारात साबुदाण्याचा समावेश करू शकतात