मधुमेहाच्या रुग्णांना आहाराची काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. टाइप २ मधुमेह असलेल्या रुग्णांनी आपल्या आहारासंबंधीचे नियम काटेकोरपणे पाळणे अतिशय आवश्यक आहे. निरोगी आहार अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतो, तसेच त्यामध्ये भरपूर फायबर असते. फायबरयुक्त पदार्थ रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप प्रभावी ठरतात.

मार्च २०१८ च्या जर्नल ऑफ कायरोप्रॅक्टिक मेडिसिन रिव्ह्यूच्या संशोधकांच्या मते, टाइप २ मधुमेह असलेल्या रुग्णांनी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. या पदार्थांमध्ये ब्राऊन राईस, बार्ली आणि क्विनोआ, सोयाबीन, शेंगा, राजमा, गार्बानझो, मटार, ओट्स, रास्पबेरी तसेच सफरचंद आणि नाशपाती यांचा समावेश होतो.

Photos : ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या आजारांपासून ‘ही’ फळे करतील आरोग्याचे रक्षण; आजच करा आहारात समावेश

फायबरचे दोन प्रकार आहेत, एक विद्राव्य फायबर आणि दुसरा अविद्राव्य फायबर. मधुमेही रुग्णांसाठी दोन्ही प्रकारचे फायबर फायदेशीर असले तरी तज्ज्ञ विद्राव्य फायबरवर अधिक भर देण्याचा सल्ला देतात. विद्राव्य फायबर कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी करते, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

फायबरचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही कारण ते पचवता येत नाही. फायबरच्या सेवनाने रक्तातील साखरेवरील कार्बोहायड्रेट्सचा प्रभाव कमी होतो. कार्बोहायड्रेट पचल्यावर साखरेमध्ये मोडतात आणि रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात. फायबर समृध्द अन्न पचण्यासाठी आतड्यांना थोडा जास्त वेळ लागतो आणि यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते. टाइप २ मधुमेहाच्या रूग्णांसाठी एका दिवसात किती फायबर आवश्यक आहे ते जाणून घेऊया.

Health Tips : तुम्हालाही खूप राग येतो? तर होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार; जाणून घ्या बचावाच्या पद्धती

टाइप २ मधुमेहाच्या रुग्णांसाठी एका दिवसात किती फायबर आवश्यक?

अमेरिकन डायबिटीज असोसिएशन (ADA) नुसार, मधुमेहाच्या रुग्णांना साखर नियंत्रित करण्यासाठी दररोज प्रति एक हजार कॅलरीजमध्ये किमान १४ ग्रॅम फायबरचे सेवन करणे आवश्यक आहे. फायबर मिळवण्यासाठी अळशी, कडधान्ये, मेथी दाणे, पेरू आणि तृणधान्यांचा आहारात समावेश करावा. हे सर्व पदार्थ तुमची रोजची फायबरची गरज सहज पूर्ण करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)