How To Identify Pure Ghee: भारतीय किचनमध्ये बाकी काही नसलं तरी तुपाची बरणी नेहमीच पाहायला मिळते. गाईच्या दुधापासून बनलेल्या साजूक तुपाच्या सेवनाने अनेक मोठे आजार टळतात असे आयुर्वेदात सांगण्यात आले आहे. अगदी मिठाई ते काही स्पेशल भाज्या जारो करायच्या असतील तर त्यावर तुपाची धार सोडली जाते. वरण- भात त्यावर साजूक तूप हे अनेकांचे कम्फर्ट फूड आहे. सत्यनारायणाच्या पूजेला बनणारा खास प्रसादही तुपाशिवाय अपूर्णच आहे. तुम्हाला माहित आहे का अनेक पोषणतज्ज्ञ तर वजन कमी करण्यासाठी सुद्धा तुपाचे सेवन करण्याचा सल्ला देतात अशा बहुपयोगी तुपात भेसळ करून विकण्याचे प्रकार अलीकडे समोर येऊ लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक घरांमध्ये साजूक तूप बनवले जाते मात्र ज्यांना शक्य नसेल ते बाजारातून अगदी ब्रँडेड तूप घरी घेऊन येतात. अगदी बड्या बड्या ब्रॅन्डच्या तुपातही भेसळ होऊ शकते. त्यामुळे तुम्ही नीट पारखून मगच तूप आहारात वापरावे. यासाठी आज आपण काही घरगुती उपाय पाहणार आहोत. भेसळयुक्त तुपाचा रंग आणि स्वरूप पटकन डोळ्याने वेगळे ओळखता येईलच असे नाही पण अशावेळीआपण घरीच तुपाची योग्यता व शुद्धता तपासून पाहू शकता. चला तर मग जाणून घेऊयात या हॅक..

हिट टेस्ट

सर्वात सोपा उपाय म्हणजे एका भांड्यात एक चमचा तूप गरम करणे. जर तूप लगेच वितळले आणि गडद तपकिरी रंगाचे झाले तर ते शुद्ध दर्जाचे आहे. पण, जर ते वितळण्यास वेळ लागला आणि त्याचा रंग हलका पिवळा झाला तर ते भेसळयुक्त असते.

फक्त स्पर्श करा..

तुमच्या तळहातात एक चमचा तूप वितळले तर ते शुद्ध आहे जर ते चिकट थरासारखे राहिले तर ते भेसळयुक्त आहे ओळखावे.

डबल-बॉयलर टेस्ट

तुपात खोबरेल तेलाचे अंश आहेत की नाही हे तपासण्यासाठी, डबल-बॉयलर पद्धतीचा वापर करून काचेच्या भांड्यात तूप वितळवून घ्या (उकळत्या पाण्याच्या भांड्यावर दुसरे भांडे व त्यात तूप ठेवून डबल बॉयलर तयार करू शकता). ही बरणी काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा. जर तूप आणि खोबरेल तेल वेगवेगळ्या थरांमध्ये साचले तर तूप भेसळयुक्त आहे हे ओळखावे.

आयोडीन चाचणी

थोड्या वितळलेल्या तुपात आयोडीनचे दोन थेंब टाका. जर आयोडीनचा रंग जांभळा झाला, तर हे सूचित करते की तुपात स्टार्च मिसळले आहे आणि असे तूप घातक असू शकते.

शेक इट टेस्ट

एका पारदर्शक बाटलीत एक चमचा वितळलेले तूप घ्या आणि त्यात चिमूटभर साखर घाला. बाटलीचे झाकण बंद करा आणि थोडं हलवा. पाच मिनिटे स्थिर झाल्यावर जर बाटलीच्या तळाशी लाल रंग दिसला तर तुपात वनस्पती तेल आहे हे ओळखावे.

तुमच्या उंचीप्रमाणे तुमचे वजन किती असायला हवे? Perfect बॉडी साठी पाहा सोप्पा तक्ता

दरम्यान साजूक तुपाचे स्वरूप रवाळ असते तसेच तुम्ही तुपाची बरणी उघडताच एक सुगंध तुम्हाला जाणवू शकेल. भेसळयुक्त तुपाचे सेवन आरोग्यावर वाईट परिणाम घडवून आणू शकते आणि बहू औषधी गुण असणार तूपही अपायकारक ठरू शकते. अशाप्रकारचे भेसळयुक्त तूप टाळा आणि सुरक्षित राहा!

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to check pure ghee by home hacks diwali preparation tips how to make ghee at home svs
First published on: 09-10-2022 at 15:02 IST