पावसाळ्यात दरवर्षी नळावाटे घाणेरडे आणि गढूळ पाणी येते. अशावेळी हे पाणी स्वच्छ करायचे कसा असा प्रश्न पडतो. यासाठी अनेकजण घरात पिण्याचे पाणी फिल्टर करण्यासाठी प्युरिफायर वापरात. पण लोक अंघोळीसाठी आणि इतर कामांसाठी वापरल्या जाणार्‍या पाण्याच्या स्वच्छतेकडे फारसे लक्ष देत नाहीत.

घाणेरडे किंवा प्रदूषित पाण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम केवळ ते पिण्याच्या पाण्यातूनचं होत नाहीत तर आंघोळ आणि हात-पाय धुण्यासाठी वापरलेल्या पाण्यामुळे देखील होतात. यामुळेच पावसाळ्याच्या दिवसात लोकांना त्वचा आणि डोळ्यांची अॅलर्जीच्या आरोग्य समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी नळाचे पाणी स्वच्छ आणि शुद्ध करण्याचे घरगुती उपाय सांगत आहोत.

१) नळावर कार्बन फिल्टर बसवा

नळावर तुम्ही कार्बन फिल्टर बसवू शकता, जे पाणी फिल्टर करण्याचे काम करते. फार महाग नसल्याने ते कोणीही खरेदी करू शकते.

हे फिल्टर वापरल्यास तुम्हाला पाण्यातील घाण काढण्यासाठी वेगळे काहीही करण्याची गरज लागत नाही. कारण ते पाण्यात असलेले विविध प्रकारचे प्रदूषक, रेडॉन, क्लोरीन, बॅक्टेरिया आणि शिसे सारखे धातू स्वच्छ करण्यास मदत करते.

२) आंघोळीचे पाणी कसे करा स्वच्छ

आंघोळीचे पाणी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही शॉवर फिल्टर वापरू शकता. जे शॉवर हेडमध्ये फिट केले जाते. ज्यातून पाणी फिल्टर होऊन सरळ बाहेर येते.

पाण्यातील क्लोरीन, क्लोरामाइन आणि इतर दूषित घटक काढून टाकण्यासाठी हे फिल्टर प्रभावी मानले जाते. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात पाण्यामधून येणारा विचित्र वास, चव आणि रंग बर्‍याच प्रमाणात सुधारतो, जो तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी आरोग्यदायी असतो.

३) नळाद्वारे येणारे पाणी असे करा स्वच्छ

नळावाटे येणारे पाणी स्वच्छ नसल्यास, ते स्वच्छ करण्यासाठी सोडियम एस्कॉर्बेट पावडर वापरू शकता. तुम्ही ही पावडर दुकानातून सहज खरेदी करू शकता, तसेच ते वापरण्यासही सोपे आहे.

बादलीतील गढूळ पाणी तुम्ही आंघोळीसाठी किंवा हात- पाय धुण्यासाठी पाणी वापरणार असाल तर त्यात ५ मिनिटे आधी एक चमचा सोडियम एस्कॉर्बेट घालावे लागेल.

४) असे स्वच्छ करा पिण्याचे पाणी

जर तुमच्याकडे फिल्टर नसेल किंवा तो खराब झाला असेल तर तुम्ही पावसाळ्यात पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटी वापरू शकता. तुम्हाला ही बाजारात अगदी सहज मिळेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्ही तुरटी एका स्वच्छ सुती कपड्यात बांधून साठलेल्या पाण्यात टाका. पाणी पांढरे दिसायला लागल्यावर पाण्यातून तुरटी काढून पाणी झाकून २-३ तास असेल ठेवा. या काळात कोणीही पाण्याचा वापर करू नये हे लक्षात ठेवा.