Toilet Cleaning Hack: दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. घराची साफसफाई, फराळ यासगळ्याची तयारी सर्वत्र सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. यात घराच्या साफसफाईकडे तर आपण अगदी काटेकोरपणे लक्ष देतो. खिडक्या, पंखे सगळे अगदी चकाचक होतील याची खात्री करतो. पण अनेकदा या सगळ्यात टॉयलेट नीट साफ करायचं राहून जातं.
अनेकदा टॉयलेट स्वच्छ केलं तरी त्यातून दुर्गंधी येते विचित्र असा घाणेर्डा वास येतो. नेहमीच टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी महागड्या केमिकल्सयुक्त प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. पण अनेकदा स्वच्छता ठेवूनही टॉयलेटमधून घाण वास येतो. म्हणूनच महागड्या प्रोडक्ट्सचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी एका जुगाडानेच तुम्ही तुमचं टॉयलेट स्वच्छ आणि सुगंधी ठेवू शकता.
आजच्या काळात प्रत्येक गोष्टीत भरपूर केमिकल्स वापरली जातात, म्हणूनच अनेक लोक हळूहळू नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक पर्यायांकडे परतत आहेत. स्वच्छतेच्या क्षेत्रातही घरगुती उपचारांचे महत्त्व वाढत आहे. सध्या असाच एक उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.
टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी शून्य रुपयाचा जुगाड
- एका वाटीत एक चमचा मीठ एक चमचा खायचा सोडा घ्या.
- यानंतर त्याच मिश्रणात अर्धा लिंबू पिळून घ्या.
- लिंबू पिळून झाल्यानंतर ३ ते ४ चमचे पाणी त्यात अॅड करा.
- लिंबू नसेल तर तुम्ही व्हिनेगरदेखील वापरू शकता.
- हे मिश्रण चांगलं एकत्रित करून घ्या.
- यानंतर ७ ते ८ काडेपेटीच्या काड्या घ्या.
- काडेपेटीची टीप म्हणजेच त्याच्या वरच्या भागाची पावडर करून घ्यायची आहे.
- त्यानंतर ही पावडरदेखील त्या मिश्रणामध्ये टाका.
- यानंतर थोडा शाम्पूही त्यात अॅड करा. आणि त्याला मिक्स करून घ्या.
अनेकदा टॉयलेट स्वच्छ असतं पण त्यातून खूप घाण वास येत असतो. दुर्गंधी येत असते. हाच वास घालवण्यासाठी या मिश्रणाचा वापर करायचा आहे.हे मिश्रण टॉयलेटमध्ये ओतून अर्धा तास टॉयलेट बंद ठेवा. त्याचा वापर करू नका. अर्ध्या तासानंतर फक्त पाणी ओतून टॉयलेट धुवून घ्यायचं, तुम्ही ब्रशनेदेखील घासू शकता.
कोणत्याही महागड्या केमिकलचा वापर न करता घरच्या घरीच हे सोल्युशन बनवून तुम्ही टॉयलेट स्वच्छ करू शकता आणि दुर्गंधी गायब करू शकता.
टॉयलेट साफ करण्यासाठी आणि दुर्गंधी घालवण्यासाठीचा हा घरगुती सोपा उपाय @puneritadka या युट्यूब अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.