How to get rid of dry, itchy eyes: आताची जीवनशैली ही स्क्रीनशिवाय अपूर्ण आहे. बहुतेक लोक तासनतास मोबाइल, लॅपटॉप किंवा टीव्ही स्क्रीनसमोर बसतात. याचा डोळ्यांवर विपरीत परिणाम होत असतो. सतत स्क्रीनकडे पाहिल्याने डोळे कोरडे होऊ शकतात. त्यामुळे जास्त खाज येऊ शकते. तुमच्यासोबत असं वारंवार घडत असेल, या काही गोष्टी तुम्हाला नक्की फायदेशीर ठरतील. डोळ्यातील कोरडेपणा आणि खाज सुटण्यापासून प्रभावीपणे आराम मिळवण्यासाठी एक अतिशय सोपी ट्रिक जाणून घ्या…

जेव्हा आपण मोबाईल फोन किंवा लॅपटॉपसमोर असतो तेव्हा आपण खूप कमी वेळा डोळ्यांची उघडझाप करतो. संशोधनातून असे दिसून आले की, स्क्रीन वापरताना डोळे उघड-बंद करण्याचे प्रमाण अंदाजे ६० टक्क्यांनी कमी होते. याचा थेट परिणाम डोळ्यांच्या आर्द्रतेवर होतो. त्यामुळे त्यांना कोरडेपणा, लालसरपणा आणि खाज सुटणे अशा समस्या जाणवतात. याकडे तुम्ही दीर्घकाळ दुर्लक्ष केले तर ही समस्या आणखी वाढू शकते.

ही समस्या कशी दूर करावी?

आपले डोळे निरोगी ठेवण्यासाठी डोळे उघडबंद करण्याचा व्यायाम केला पाहिजे. हा व्यायाम नैसर्गिकरित्या डोळ्यांना आर्द्रता देतो.

डोळ्यांचा व्यायाम कसा करावा?

  • २ सेकंद डोळे बंद करा, नंतर हळूहळू उघडा. असे ५ वेळा करा.
  • डोळे बंद करा आणि हलक्य दाबाने २ सेकंद डोळे घट्ट बंद करा. नंतर ते हळूहळू उघडा. हे ५ वेळा करा.
  • योगगुरूंच्या मते, हे दोन्ही व्यायाम डोळ्यांच्या पृष्ठभागावर एक संरक्षक तेलाचा थर तयार करतात. हा थर डोळ्यांना कोरडे होण्यापासून वाचवतो आणि त्यांना ओलावा देतो.

या टिप्सही फॉलो करा

  • दर २० मिनिटांनी स्क्रीनवरून नजर हटवा आणि २० सेकंदांसाठीदूरच्या वस्तूकडे पहा.
  • तुमच्या डोळ्यांसाठी स्क्रीन ब्राइटनेस लेव्हल आरामदायी लेव्हलवर सेट करा.
  • शरीर आणि डोळे हायड्रेटेड राहण्यासाठी पुरेसे पाणी प्या.
  • या सगळ्यानंतरही डोळ्यांमध्ये जळजळ किंवा जास्त कोरडेपणा येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.