International Day of Yoga 2023 : आंतरराष्ट्रीय योगा दिवसाला जागतिक योगा दिन असंही म्हटलं जातं. दरवर्षी २१ जूनला जागतिक योगा दिन साजरा केला जातो. २०१४ मध्ये यूनायटेड नेशनच्या जनरल असेम्बलीने याबाबत अधिकृत घोषणा केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक योगा दिन साजरा करण्यासाठी देशातील तमाम जनतेला आवाहन करत असतात. शारिरीक, मानसिक आणि अध्यात्मिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी योगाचा सराव करणे महत्वाचे आहेत. सूर्य नमस्कार योगाचा महत्वाचा प्रकार असून याचे आरोग्यास अनेक फायदे होतात. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

१) तदासना

दोन्ही पायांवर उंच उभे राहा. छातीसमोर दोन्ही हात जोडून नमस्ते पोजिशनमध्ये उभे राहा आणि तुमचे खांदे रिलॅक्स ठेवा.

२) इनहेल

श्वास घेत दोन्ही हातांना वरच्या बाजूने घेऊन जा आणि मागच्या बाजूला थोडसं बेंड व्हा. याला हस्त उत्तनासना असं म्हणतात.

३) हस्तपादासन

या सूर्य नमस्काराच्या प्रकार करत असताना तुम्हाला श्वास सोडताना पाठीचा कणा सरळ ठेऊन पुढच्या दिशने खाली वाकावे लागते. श्वास सोडल्यानंतर तुमचे तळहात जमिनीवर पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या शरीराची लवचिकता अधिक वाढेल.

४) दंडासन

तुम्ही श्वात घेत असताना डावा पाय मागे घ्या. त्यानंतर तुमचे संपूर्ण शरीर एका रेषेत सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा.

नक्की वाचा – बिबट्याने पाण्यात राहून नेम धरला अन् काही सेकंदातच मगरीची केली शिकार, थरारक Video पाहून अंगावर काटा येईल

५) अष्टांग नमस्कार

गुडघे जमिनीवर हळूवारपणे आणण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर श्वास बाहेर सोडा. छाती, हनुवटी जमिनीवर आरामात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पार्श्वभाग उंचावण्याचा प्रयत्न करा.

६) भुजंगासन

जमिनीवर सरळ रेषेत खाली राहून छातीला उंचवा आणि हाताचे कोपरे हळूवारपणे वाकवा. खांद्यांना रिलॅक्स ठेवा आणि वर पाहा.

७) पर्वतासन

श्वास सोडल्यानंतर माकडहाड आणि पार्श्वभाग वरती घेण्याचा प्रयत्न करा आणि छाती खालच्या बाजूला उलट्या व्हिच्या आकारात ठेवा.

८) अश्व संचालनासन

सूर्यनमस्काराच्या या प्रकारामध्ये श्वास घेत असताना तुम्हाला उजवा पाय पुढे आणत दोन्ही हातांच्या मध्ये ठेवावा लागतो. त्यानंतर डावा गुडघा जमिनीवर ठेवावा लागतो आणि नितंब खाली खेचन वरती पाहावे लागते.

९) हस्त पादासन

श्वास सोडून डावा पाय पुढे आणल्यानंतर तळहात जमिनीवर ठेवा. आवश्यकता असल्यास गुडघे थोडे वाकवू शकता.

१०) हस्तौत्तनासन

श्वास घेत पाठ सरळ केल्यानंतर वरच्या दिशेने पाहा. नितंब पुढे घेऊन पाठिमागे वाकण्याचा प्रयत्न करा.