scorecardresearch

एका नजरेत गोड कलिंगड कसे ओळखाल? न कापता, न चाखता भेसळीची ‘ही’ सहा चिन्हे आधी ओळखा

How To Buy Best Watermelon: आज आपणच न कापता, न चाखता कलिंगड गोड आहे की नाही हे कसे ओळखायचे हे पाहणार आहोत.

How To Find Sweet Watermelon Without Cutting or Tasting Check These Signs Of Raw And Adulterated Fruits Summer Hacks
एका नजरेत गोड कलिंगड कसे ओळखाल? (फोटो: Pexels)

How To Find Sweet Watermelon: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वात जास्त मान आंब्याला असला तरी कलिंगडाची फॅन फॉलोईंग सुद्धा कमी नाही. अनेकदा आपण हौशीने कलिंगड घेऊन येतो खरं पण ते आतून अगदीच पांढरं आणि अगोड निघते. मग एकीकडे पैसे वाया गेल्याचा आणि दुसरीकडे एवढा जड कलिंगड उचलून आणल्याचा पश्चाताप होतो तो वेगळाच. खरंतर आपण बाजारात कधीही फळे विकत घेता ना ‘गोड आहे ना?’ हा प्रश्न विचारतोच पण तुम्हीच सांगा ज्यांना ते फळ विकायचेच आहे ते नेहमीच खरं सांगतील का? त्यामुळे आज आपणच न कापता, न चाखता कलिंगड गोड आहे की नाही हे कसे ओळखायचे हे पाहणार आहोत.

गोड कलिंगड कसे ओळखायचे? (How To Buy Correct Watermelon)

  • कलिंगडाची शेंडी तपासायची. ती सुकलेली असली की समजायचं की फळ तयार आहे. म्हणजेच आतून लाल झालंय. आणि लाल झालं असेल तर ते गोड असणार.
  • काही कलिंगडवर पांढरे डाग असतात,काहींवर पिवळे तर काहींवर केशरी – पिवळे.पांढरा डाग असलेला कलिंगड कधीही घेऊ नये.शक्यतो पिवळसर किंवा केशरी पिवळसर डाग असलेला कलिंगड खूप गोड असतो.
  • ही जाळी म्हणजे पोलीनेशन प्रक्रियेच्यावेळी माश्यांनी अधिक वेळा फुलांना स्पर्श केला आहे.जास्त जाळी म्हणजे गोड कलिंगड.
  • कलिंगडावर हाताने फटका मारा, जर पोकळ आवाज आला तर समजा कलिंगड पिकला आहे.
  • तुम्ही कलिंगड लहान घ्या किंवा मोठा , तो वजनाने जड असायला हवा.

याशिवाय, अलीकडेच @drhukiresv या इंस्टाग्राम अकाऊंटवरून कलिंगड भेसळयुक्त आहे की नाही हे कसे ओळखायचे याविषयी सविस्तर व्हिडिओतून माहिती देण्यात आली आहे, ही माहितीसुद्धा पाहूया..

हे ही वाचा << तोंडावर नाही ताबा पण बारीक व्हायचंय बाबा? ‘या’ १० स्टेप्ससह सतत लागणारी भूक नियंत्रणात आणा

उन्हाळ्यात कलिंगड हा आरोग्यासाठी उत्तम मानला जातो. यामुळे शरीरातील पित्त कमी होऊन थंडावा मिळतो, या उन्हाळयात आपण वर दिलेल्या टिप्स वापरून उत्तम कलिंगड घरी आणा व त्याच्या भन्नाट रेसिपी ट्राय करायला विसरु नका.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-03-2023 at 10:13 IST
ताज्या बातम्या