बदलती जीवनशैली आणि कामाच्या व्यस्त टाइमटेबलमुळे अनेकजण तणाव, चिंता आणि इतर आरोग्य समस्यांचा सामना करत आहे. याचा झोपेवरही विपरित परिणाम होत आहे. जर तुम्हीही कामामुळे सतत तणावाखाली, चिंतेत असाल तर तुम्हाला झोपेसंबंधीत विकारांची लक्षणं जाणवू शकतात. त्यामुळे प्रत्येकाला निरोगी राहण्यासाठी रोज किमान ७ ते ८ तासांची झोप गरजेचीच असते.  चांगल्या झोपेसाठी वेळ महत्वाची असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या झोपण्याची योग्य वेळ ठरवणे आवश्यक आहे. काहीही झाले तरी त्याच वेळेत तुम्ही झोप घ्या. वेळ शक्यतो चुकवू नये. असे केल्यास तुम्हाला चांगली झोप लागण्यासाठी मदत होईल. तसेच झोपण्यापूर्वी एखादे चांगले गाणे किंवा पुस्तक वाचायची सवय लावा यामुळे देखील तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत होऊ शकते.

जर का रात्री झोपताना तुम्ही अंथरुणावर कूस बदलत असाल आणि यामुळे तुम्हाला झोपायला त्रास होत असेल तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही सुधारणा करणे आवश्यक आहे. आज आपण काही योगासनांबद्दल माहिती पाहणार आहोत जे तुम्ही झोपण्यापूर्वी केल्यास तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. या योग्य मुद्रा (योग मुद्रा टिप्स) केल्यास तुम्हाला रात्री शांत आणि चांगली झोप येण्यास मदत होईल.

हेही वाचा : भारतासह ‘हे’ चार देश १५ ऑगस्टला साजरा करतात स्वातंत्र्यदिन, जाणून घ्या

जर का तुम्हाला रात्री चांगली झोप मिळत नसेल तर झोपण्यापूर्वी बालासन ही योग्य मुद्रा करावी. यामुळे तुम्हाला चांगली झोप मिळण्यास तर मदत होईलच, त्याशिवाय तुमचे पोट देखील चांगले राहील ज्यामुळे पचनक्रिया सुधारेल. ही योग मुद्रा स्नायूंना आराम मिळतो ज्यामुळे तुम्हीं काही वेळेतच चांगली झोप येण्यास मदत होईल.

तसेच तुम्हाला रात्री शांत झोप येत नसेल तर शांत आणि चांगली झोप यावी म्हणून तुम्ही जानू शीर्षासन देखील करू शकता. हे आसन नितंबांवर पुढे वाकून केले जाते. हे आसन करत असताना डोक्याला गुडघ्यापर्यंत किंवा त्यापुढे स्पर्श केला जातो. यामुळे खांदा, मणका, हॅमस्ट्रिंग, मान, पोटाचे स्नायू चांगले ताणले जातात. ज्यामुळे तुम्हाला तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होऊ शकते.

हेही वाचा : नवरा-बायकोच्या नात्यात नेहमी राहील गोडवा अन् प्रेम; फक्त ‘या’ तीन गोष्टींकडे कधीही करू नका दुर्लक्ष!

बेडवर किंवा गादीवर झोपायला गेल्यानंतर देखील झोप न येणे ही एक सामान्य गोष्ट आहे. आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो उपाय सैनिकांनी अवलंबला आहे. तुम्हाला तुमच्या बेडवर झोपल्यानंतर तुमचे संपूर्ण शरीर पूर्णपणे आरामशीर सोडायचे आहे आणि तुमची बोटे देखील सैल सोडायची आहेत. यामुळे तुम्हाला शांत आणि चांगली झोप लागण्यास मदत होऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)