How to get rid of mosquitoes naturally: देशाच्या अनेक भागांत थंडी कमी होऊ लागली आहे आणि उष्णता वाढू लागली आहे. उष्णता वाढत असताना डासांची संख्याही झपाट्याने वाढू लागते, डासांच्या चावण्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि इतर अनेक गंभीर आजारांसह अनेक आजार होतात. खेड्यापासून मोठमोठ्या शहरांपर्यंत प्रत्येक ठिकाणी डासांची दहशत पाहायला मिळते. अनेक उपाय करूनही डासांची ही पैदास कमी होत नाही, त्यामुळेच आज आम्ही डासांना दूर पळवून लावण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

डासांना पळवण्यासाठी उपाय

कडुलिंबाचा धूर

डासांना दूर ठेवण्यासाठी कडुलिंबाचा धूर खूप प्रभावी आहे. यासाठी तुम्ही सुक्या कडुलिंबाची पाने जाळून त्याचा धूर घरात पसरवू शकता. तुम्ही कडुलिंबाच्या तेलाचा दिवादेखील लावू शकता. यामुळे खोलीतील वातावरणही सुधारते.

लसणाच्या रसाची फवारणी

डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रथम लसूण पाण्यात उकळा. आता तुम्ही हे पाणी तुमच्या खोलीत व्यवस्थित फवारा

डास प्रतिबंधक वनस्पती लावा

तुमच्या घरात काही झाडे लावून तुम्ही डासांना सहज पळवू शकता. तुम्ही तुमच्या घरात झेंडूची फुले किंवा तुळशीची झाडे लावू शकता. या दोन्ही वनस्पतींच्या वासापासून डास दूर राहतात.

सुगंधी तेल

डास पळवून लावून स्वतःसह घरातल्यांचे संरक्षण करण्यासाठी लव्हेंडर, कडुलिंब, सिट्रोनेला, निलगिरी व पुदीना यांपैकी एखादे तेल वापरा. एका स्प्रे बाटलीत त्यातील एका तेलाचे काही थेंब पाण्यात मिसळा आणि ते तुमच्या घरात शिंपडा. तसेच तुमच्या संरक्षणासाठी कडुलिंबाचे तेल, खोबरेल तेल व लव्हेंडर तेलाचे काही थेंब एकत्र करून, अशा संमिश्रित तेलयुक्त पाण्याचा स्प्रे तयार करून त्याची सर्वत्र फवारणी करा.

घराच्या स्वच्छतेची काळजी घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुमच्या घरातून डासांना दूर करण्यासाठी, सर्वप्रथम तुमचे घर स्वच्छ ठेवा आणि घरात पाणी साचू देऊ नका. खरंतर जिथे पाणी साचलेले असते तिथे डासांची सर्वाधिक पैदास होते. घरात कोणताही कचरा किंवा घाण राहू देऊ नका.