Winter Tips: हळूहळू राज्यात थंडीची लाट पसरण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतही पहाटे आल्हाददायक थंडी अनुभवायला मिळत आहे. कडक उन्हाचा पारा नाही किंवा पावसाचा चिखलही नाही आणि तरीही ऊन व गारव्याचा मेळ साधणारी ही थंडी सर्वांनाच हवीहवीशी वाटते. थंडीत मस्त मऊ चादर अंगावर घेऊन लोळत पडण्याची मज्जा काही औरच. पण या मस्त उबदार चादरीत आपले थंड पडलेले पायाचे तळवे जरा मूड घालवतात हो ना? म्हणूनच अनेकजण थंडीत रात्री पायात व हातात मोजे घालून झोपतात. तुम्हीही असं करत असाल तर आजच थांबा.

न्यूरॉलॉजिस्ट PMCH डॉ. संजय कुमार यांनी दैनिक भास्करला माहितीनुसार हातमोजे किंवा पायात मोजे घालून झोपणं हे अत्यंत नुकसानदायक ठरू शकतं. इतकंच नव्हे तर तुम्ही डोक्यावरून चादर घेऊन झोपत असाल तर यानेही शरीराचे मोठे नुकसान होऊ शकते. डॉ. कुमार सांगतात की, झोपताना कधीच तोंड झाकून झोपू नये कारण यामुळे मेंदूला कमी ऑक्सिजन मिळून याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. डोक्यावरून चादर घेऊन झोपणं किंवा पायात मोजे घालून झोपल्याने नेमके काय नुकसान होऊ शकते हे सविस्तर पाहुयात..

रक्तप्रवाहात अडथळा

डोक्यावरून पूर्ण चादर घेऊन न झोपण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. असे केल्याने आपण केवळ ब्लॅंकेटमध्ये असणाऱ्या हवेतील कमी प्रमाणात ऑक्सिजन शरीरात श्वसनातून घेतो. ऑक्सिजन कमी असल्याने या हवेत अशुद्धता अधिक असते व परिणामी फुफ्फुसांमध्येही अशी अशुद्ध हवा जमा होते. ऑक्सिजनचा कमी पुरवठा झाल्याने शरीरात रक्तप्रवाहाला सुद्धा अडथळा निर्माण होतो. यामुळेच अनेकदा रात्री सलग झोप न लागणे किंवा झोपताना तळमळत राहणे हे त्रास जाणवू शकतात.

हे ही वाचा<< बदाम खाल्ल्याने ‘हे’ ४ त्रास १०० च्या वेगाने वाढू शकतात! एका दिवसात किती व कसे बदाम खाणे आहे योग्य?

त्वचेचे त्रास

जर तुम्ही निकृष्ट दर्जाच्या कापडाचे मोजे वापरले तर त्यामुळे अर्थातच लगेच त्वचेचे संसर्ग जाणवू शकतात. पण जरी तुम्ही मऊ मोजे वापरत असाल तरीही काही कालावधीने त्यातील नायलॉन हे त्वचेला त्रासदायक ठरू शकते. सलग अधिक वेळ मोजे घालून राहिल्यास यामुळे त्वचेवर लालसर चट्टे उमटणे व मुख्यतः त्वचेला खाज येण्याची समस्या वाढू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे ही वाचा<< कोलेस्ट्रॉलच्या त्रासावर ‘हे’ ४ पदार्थ करतात रामबाण उपाय; परफेक्ट बॉडीसाठी टेस्टी पर्याय पाहा

थंडी वाजत असल्यास हे उपाय करून पाहा..

  • झोपण्याआधी थोडी हालचाल करा. शतपावलीने सुद्धा शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होते.
  • झोपताना पायाला गरम तेल मालिश करा.
  • मोजे घालण्याऐवजी गरम पाण्याची पिशवी घेऊन झोपा
  • तुम्ही झोपण्याच्या आधीपर्यंत मोजे घालत असाल तरीही हरकत नाही फक्त मोजे घालून झोपू नका .
  • झोपण्याआधी गरम पाण्याने आंघोळ करू शकता