शरीरावरील नको असलेले केस काढण्यासाठी अनेक महिला हेअर वॅक्सिंग करतात. यासाठी हजारो रुपये खर्च करतात. पण, काहीवेळा बाजारात मिळणाऱ्या हेअर वॅक्सिंग क्रीममुळे त्वचेचे नुकसान होते. हातावर पुरळ किंवा पॅच येतात, तर काही लोकांना याची ॲलर्जी होते. अशावेळी तुम्ही अगदी कमी पैशांत घरच्या घरी हेअर वॅक्सिंग क्रीम बनवू शकता, जे शरीरास हानीकारक तर नाहीच शिवाय त्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे सर्वप्रथम घरच्या घरी ही हेअर वॅक्सिंग क्रीम कशी बनवायची जाणून घेऊ…

घरच्या घरी हेअर वॅक्सिंग क्रीम बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

१) १ कप साखर
२) १/८ कप लिंबाचा रस किंवा सफरचंद सायडर व्हिनेगर
३) १/८ कप गरम पाणी

यानंतर गॅसवर एक मध्यम आकाराचे भांडे ठेवा आणि भांड्यात वरील सर्व साहित्य टाका. ते उच्च आचेवर उकळवा, जळू नये म्हणून ते वारंवार ढवळत राहा. मिश्रण उकळायला लागल्यावर, आच मध्यम करा आणि वारंवार ढवळत राहा. मिश्रण सोनेरी तपकिरी झाल्यावर भांडे गॅसवरून खाली उतरवा. हे मिश्रण साखरेसारखे जाड झाले पाहिजे, जेणेकरून ते त्वचेला चिकटणार नाही.

आता हे मिश्रण एका भांड्यात काढून ते थंड होण्यासाठी ३० मिनिटे असेच ठेऊन द्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात थोडी कॉफी पावडरही टाकू शकता. अशाप्रकारे तुमची होममेड वॅक्सिंग क्रीम तयार झाली आहे.

होममेड वॅक्सचे फायदे

होममेड वॅक्सचे अनेक फायदे आहेत. सर्व प्रथम ते एक्सफोलिएटिंग आणि हायड्रेटिंग गुणधर्मांनी भरलेले आहे, जे सहसा वॅक्सिंग किंवा शेव्हिंगनंतर आढळत नाही. शिवाय ते इतर वॅक्सपेक्षा कमी वेदनादायक आणि अधिक सौम्य असते. विशेष म्हणजे हे सहज पाण्यात विरघळणारे असते. ज्यामुळे ते स्वच्छ करणे सोपे जाते. यामुळे केसांची पातळ आणि मंद वाढ होऊ शकते.

त्यामुळे या सर्व कारणांसाठी तुम्ही घरच्या घरी तयार केलेली वॅक्सिंग क्रीम वापरली पाहिजे. याच्या मदतीने वॅक्सिंग करताना पिगमेंटेशनचा त्रास कमी करण्यासाठी त्यात तुम्ही कॉफी आणि खोबरेल तेल वापरू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(हा लेख सामान्य माहितीसाठी आहे, कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)