Clothing Hacks: लोकांना उन्हाळ्यात अनेकदा कॉटनचे कपडे घालायला आवडतात. सुती कपडे केवळ घाम शोषत नाहीत तर शरीर थंड ठेवतात. पण, कॉटनच्या कपड्यांमधली एक सामान्य समस्या म्हणजे त्यांचा रंग फिका पडतो. विशेषत: नवीन सुती कपड्यांमधून अनेक वेळा धुतल्यानंतरही रंग जात राहतो. त्यामुळे नवे कपडेही लवकरच जुने दिसू लागतात. पण, या लेखात तुम्हाला एक अशी पद्धत सांगणार आहोत, ज्याद्वारे तुमच्या कपड्यांचा रंग कधीही फिका पडणार नाही.

कॉटन कपड्यांचा रंग कसा ठेवावा कायम?


मीठ वापरा
यासाठी अर्धी बादली थंड पाणी घेऊन मीठाचे द्रावण तयार करावे. या पाण्यात ५०-६० ग्रॅम तुरटी मिसळा. आता पाण्यात दोन चमचे मीठ टाका. यानंतर कपडे पसरून पाण्यात टाका. लक्षात ठेवा की, हे कपडे इतर कपड्यांसह धुतले जाऊ नयेत. या पाण्याच्या मिश्रणात कपडे किमान २ तास राहू द्या. यानंतर हे कपडे मिठाच्या पाण्यातून काढून स्वच्छ पाण्यात धुवावेत, म्हणजे कपड्यांमधून मीठ आणि तुरटीचा अंश निघून जाईल.

हेही वाचा – तुमची झोप पूर्ण होत नाही का? तुमच्या ‘या’ पाच सवयींमुळे बिघडते तुमचे चयापचय

व्हिनेगरचा वापर
सूती कपडे मीठ आणि तुरटीच्या पाण्याने धुतल्यानंतर व्हिनेगरचे पाणी वापरावे. असे केल्याने कपड्यांचा रंग जाणार नाही. कपडे व्हिनेगरच्या पाण्यात किमान अर्धा तास भिजवून ठेवा. चुकूनही हे कपडे उन्हात वाळवू नका, असे केल्याने कपडे कोमेजतात. हे कपडे सावलीत सुकवण्यासाठी ठेवा.

हेही वाचा – कलिंगड खाल्यानंतर त्याची साल कचऱ्यात टाकू नका, ‘असा’ करा वापर, मिळतील जबरदस्त फायदे

फॅब्रिक डाय वापरा
वारंवार कपडे धुतल्यानंतरही त्यातून रंग येणे थांबत नसल्याचे अनेकदा दिसून येते. त्यामुळे कपड्यांचा रंग फिका पडतो. हे जुने दिसणारे कपडे फेकून देण्याशिवाय पर्याय नाही. हे टाळण्यासाठी तुम्ही कपडे धुताना पाण्यात फॅब्रिक डाय टाकू शकता. या ट्रिकमुळे तुमचे कपडे दीर्घकाळ नवीन राहतील.