स्वयंपाक घर म्हटलं की त्यामध्ये जास्त सहवास हा त्या घरच्या गृहिणीचा असतो. त्यासोबतच संपूर्ण स्वयंपाक आजही तसेच स्वयंपाक घर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी देखील त्या गृहिणी वर येऊन पडते. साफसफाई तसेच स्वयंपाक घरातील नीटनेटकी मांडणी हे खास दक्ष गृहिणी चे काम असते. स्वयंपाक घर तुम्ही कितीही स्वच्छ ठेवले तरीदेखील छोटी-छोटी झुरळे आज-काल सर्वत्र मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात.

आज-काल किचन मध्ये ट्रॉली करण्याची पद्धत आहे यामुळे तर झुरळांच्या संख्येत कमालीची वाढ होते. अशी अडगळ अडचण झाल्यामुळे ती जागा व्यवस्थित साफ देखील करता येत नाही. स्वयंपाक घरामध्ये झुरळ वावरताना दिसेल तर याहून किळसवाणी गोष्ट कोणतीच नाही. याकरता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत घरातून झुरळे पळवून लावण्याच्या काही सोप्या ट्रिक्स.तर मैत्रिणींनो काही दिवसातच किचनमध्ये उंदीर, मच्छर, झुरळांचा समूळ नायनाट कसा करता येईल ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत. केवळ या एका पदार्थामुळे चे सगळे झुरळ होतील तुमच्या घरातून गायब. तेही अगदी कमी खर्चामध्ये या घरगुती उपायामुळे. आणि पुन्हा तुमच्या स्वयंपाक घरात कधीही झुरळ दिसणार नाहीत. सर्वप्रथम पाहूयात हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणते साहित्य लागणार आहे.

५ मिनिटमध्ये गायब

तुम्हाला कापराच्या वड्या लागणार आहेत, बेकिंग सोडा, डिर्टजन पावडर, लिंबू आणि कापूस लागणार आहे. यानंतर करायचं काय तर, कापूर बारीक करुन घ्या, त्याची बारीक पावडर, एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात टाका. त्यानंतर त्यात बेकिंग सोडा, डिर्टजन पावडर, लिंबू टाका. हे सर्व मिक्स केल्यानंतर त्यात कापसाचे एक एक गोळे बुडवून घ्या आणि हे कापसाचे बोळे किचनमध्ये वेगवेगळ्या अडचणींच्या जागी ठेवा. व्हिडीओमध्ये तुम्ही स्वत:च पाहा ना..

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kitchen Jugaad: झोपण्याआधी फक्त एकदा तांदळामध्ये ही ‘पोटली’ ठेवा, सकाळी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.