Sun Tan Removal Face Mask : सुर्याच्या किरणांपासून त्वचेला वाचवायचा आपण नेहमी प्रयत्न करतो तरीसुद्धा अनेकदा त्वचा टॅन होते. त्वचेवरील टॅन दुर करण्यासाठी आपण वाट्टेल ते प्रयत्न करतो पण अनेकदा काहीही फायदा होत नाही पण आज आम्ही तुम्हाला एकही पैसा खर्च न करता घरच्या घरी फेस मास्क कसा बनवायचा, हे सांगणार आहोत.
दररोजच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेकदा आपण त्वचेची काळजी घेत नाही.त्यामुळे त्वचेवर टॅन येणे, काळे डाग पडणे इत्यादी समस्या दिसून येतात.
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी सोशल मीडियावर असे अनेक उपाय सांगणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये घरगुती नैसर्गिक फेस मास्क कसा बनवायचा, याविषयी सांगितले आहे.

  • या व्हायरल व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे-
  • एक छोट्या भांड्यात तांदळाचे पीठ घ्या
  • त्यात कॉफी पावडर टाका
  • त्यात गुलाबजल आणि लिंबू पिळा.
  • सर्व मिश्रण एकत्र करा.
  • हे मिश्रण टॅन त्वचेवर लावा आणि १५ मिनिटे ठेवा.
  • त्यानंतर त्वचा स्वच्छ पाण्याने धुवा.
  • तुम्हाला तुमच्या त्वचेवर टॅन दिसणार नाही.

हेही वाचा : कुत्रा चावल्यानंतर तातडीने काय करावे? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

kitchen_maan या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” सन टॅन घालवणारा फेस मास्क. सुंदर आणि चमकणारी त्वचा मिळवा आणि काळे डाग दूर करा. टॅन काढण्यासाठी घरगुती नैसर्गिक फेस मास्क”