scorecardresearch

Premium

डब्यातील नाचणी पीठ खराब होतंय? पाहा, पीठ साठवताना ‘या’ पाच टिप्स ठरतील फायदेशीर

नाचणीचे किंवा इतर कोणतेही पीठ बराच काळ चांगले राहण्यासाठी ते कसे साठवून ठेवावे यासाठी सोप्या आणि घरगुती टिप्स काय आहेत ते पाहा.

How to store ragi flour
नाचणी पीठ दीर्घकाळ कसे साठवून ठेवावे पहा. [photo credit – freepik]

आहारात नाचणी, नाचणीच्या पिठाचा समावेश करणे फार उपयुक्त असते. नाचणीच्या पिठाची भाकरी, पोळी, नाचणीचे सत्त्व यासोबतच घरी ब्रेड आणि ब्राउनीसारखे बरेच पदार्थ बनवता येतात. घरी किराणा आणतो तेव्हा महिनाभराचे सर्व सामान आणले जाते. त्यामुळे नाचणी किंवा कोणतीही पिठे जास्त प्रमाणात आणली जाऊन, ती बऱ्याच काळासाठी व्यवथित साठवून ठेवावी लागतात. आता अशा वेळी काही पिठे नीट ठेवली नाहीत, तर ती खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पीठ खराब न होता, जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी काय टिप्स आहेत त्या पाहा.

नाचणी पीठ कसे साठवावे?

  • बाजारातून भरपूर प्रमाणात नाचणी धान्य आणल्यास, ते सर्वप्रथम साफ करून घ्यावे. नंतर त्याला पाण्याने स्वच्छ धुऊन कडक उन्हात कोरडे करून मगच डब्यात भरून ठेवा. या नाचणीचे पीठ करण्याआधी सर्व दाणे व्यवस्थित कोरडे झाले असल्याची खात्री करून मगच त्याचे पीठ दळून घ्यावे; नाही तर पिठामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते.
  • नाचणीचे पीठ दळून आणल्यानंतर ते व्यवस्थित घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा. मात्र, या डब्याची वारंवार उघड-बंद करू नका. असे केल्यास डब्यातील पिठाचा बाहेरील हवेशी संपर्क येऊन, त्याचा ताजेपणा निघून जाईल. त्यामुळे पीठ खराब होण्याची शक्यता वाढते.

हेही वाचा : तळलेले पदार्थ मऊ पडत आहेत? पाहा, या पाच सोप्या हॅक्स करतील तुमची मदत

  • नाचणीच्या पिठाचा डबा कुठे ठेवता हेदेखील महत्त्वाचे असते. पिठाचा डबा कायम कोरड्या आणि थोडी थंड हवा असेल अशा ठिकाणी ठेवा. उन्हात, उजेडात किंवा अतिथंडावा असणाऱ्या जागेवर पिठाचा डबा ठेवल्याने किंवा सतत जागेचे हवामान बदलल्याने डब्यामध्ये ओलावा निर्माण होऊन, त्याचा परिणाम पिठावर होऊ शकतो. त्यामुळे पिठाची चव आणि त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांवर याचा परिणाम होऊ शकतो.
  • डब्यावर सूर्यप्रकाश पडणार नाही याची काळजी घ्यावी. पिठावर किंवा पिठाच्या डब्यावर सतत सूर्यप्रकाश पडल्याने त्यातील पोषक घटक कमी होतात. त्यामुळेही पीठ खराब होऊ शकते. म्हणून नाचणीच्या पिठाचा डबा एखाद्या बंद कपाटामध्ये ठेवावा.
  • नाचणीचे पीठ असो वा इतर कुठलेही पीठ, तुम्ही ते कोणत्या डब्यामध्ये भरून ठेवत आहात हे महत्त्वाचे. डब्याचे झाकण सैल असेल किंवा झाकणाला छोटी छोटी छिद्रे असणाऱ्या डब्यात पिठे साठवून ठेवल्यास त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कारण- अशा डब्यांमधून बाहेरील हवेचा संपर्क आतील पिठाला होऊन, त्याची गुणवत्ता खराब होऊ शकते. सैल झाकणामुळे पिठाला मुंग्या लागण्याचा धोकादेखील असतो. त्यामुळे कायम चांगल्या प्रतीचे हवाबंद डबे किंवा घट्ट झाकणाच्या डब्यांमध्येच नाचणीचे पीठ साठवून ठेवावे.

how to get rid of house rats tips
Cleaning tips : घरातील उंदरांना पळवून लावण्यासाठी ‘गव्हाचा’ करा वापर! पाहा या दोन टिप्स…
beauty tips in marathi get rid of dark neck
Beauty tips : मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी काय करावे, काय नको? पाहा ‘या’ टिप्स
How To Control Diabetes Sugar level Blood sugar control made easy
Blood sugar control: रक्तातील साखर कमी करण्यासाठी करा ‘हे’ सोपे व्यायाम…शुगर राहील नियंत्रणात
लेख: चित्त जेथा भयशून्य उच्च जेथा शिर.. | ABVP and BJP workers protested by shutting down a play based on characters from Ramayana at Lalit Kala Kendra
लेख: चित्त जेथा भयशून्य उच्च जेथा शिर..

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How to store ragi flour for long time use this five easy and helpful tips dha

First published on: 01-12-2023 at 14:21 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×