पावसाळा आणि आजारपण यांचं अगदी घट्ट नातंच आहे. एकीकडे वातावरणात बदल होतो आणि एक एक करत घरातील सगळेच खोकायला नाहीतर शिंकायला सुरुवाती होते. कुटुंबातील एकाला जरी हा त्रास झाला तरी तो लगेच दुसऱ्यापर्यंत पोहोचतो. त्यात ज्यांची प्रतिकारशक्ती काहीशी कमी असते अशांना सर्दी-खोकला व्हायला अजिबातच वेळ लागत नाही. त्यामुळे या त्रासापासून तुमचा बचाव करायचा असेल तर या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. शक्यतो पावसात भिजू नका. भिजलात तर लगेच ओले कपडे बदला. अंग, डोकं, केस, लगेच कोरडे करा.

२. सर्दी, खोकला, ताप आटोक्यात ठेवला नाही तर न्युमोनिया होऊ शकतो.

३. प्यायचं पाणी उकळताना सुंठ पावडर घाला. दिवसभर थोडं थोडं गरम पाणी प्या, घसा शेकला जाईल, शरीरातील टोक्झिंस निघून जातील.

४. व्हायरल ताप असेल तर पाण्यात तुळस, मध, हळद घालून काढा करा. गरम गरम प्या. हर्बल टीनेही तापाचा परिणाम कमी होतो.

५. पाण्यात हळद घालून त्या पाण्याने किंवा सलाईन water ने गुळण्या करा.

६. पावसात भिजल्यावर कपडे ओले असताना ए. सी. रूम मधे जाऊ नका.

७. दम्याचा त्रास असणाऱ्यांनी दमट, ओल्या भिंतींपासून लांब राहा. भिंतींवर बुरशीची वाढ झालेली असल्यास दम्याचा त्रास वाढू शकतो.

८. निलगिरी तेलाचे थेंब रुमालावर घेऊन अधूनमधून हुंगा. चोंद्लेल नाक मोकळं होण्यासाठी निलगिरी तेलाचे थोडे थेंब पाण्यात घालून उकळवून वाफारा घ्या. श्वास घेणं सोपं झालं की, पूर्ण शरीलाला आराम मिळेल.

९. चपला, बूट, मोजे, रेनकोट, चादरी, उशा कोरड्या आणि स्वच्छ ठेवा.

Lemon Consome

साहित्य : लिंबाचा रस- १/४ वाटी, कोथिंबीर- २ वाट्या, गूळ- ३ चमचे, आलं वाटून- दीड चमचा, कढीलिंब- २ काड्या, मिरे- १ चमचा, तूप- १ चमचा, हळद- १/२ चमचा, मोहरी- १ चमचा, मीठ- चवीनुसार.

कृती : पॅनमधे तूप तापवून, मोहरी घालून तडतडू दे. कढीलिंब पाने घालून ढवळून घ्या. अडीच कप पाणी घालून उकळी आणा. हळद आणि मीठ घाला. मिरे भरडून जाडसर पूड करा. कोथिंबीर भरडून घ्या. पॅनमधे वाटलेलं आलं, मिरपूड आणि कोथिंबीर घाला. उकळी आणा. गूळ घाला. ५ मिनिटे उकळू द्या. गॅसवरून उतरवून गाळून घ्या. नंतर लिंबाचा रस घालून सर्व्ह करा.

सर्दी, खोकला, तापापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त. हे डीटोक्स ड्रिंक आहे. प्रतिकारशक्ती वाढते, भूक वाढते, अन्नपचन सुधारते. तोंडाला चव येते.

सुकेशा सातवळेकर, आहारतज्ज्ञ

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to take care in rainy season tips to avoid cough and cold recipe
First published on: 25-07-2017 at 11:00 IST