सामान्यतः बदलत्या ऋतूनुसार त्वचेच्या समस्या जसे मुरुम, डाग आणि पुरळ येणे अशा समस्या उद्भवू लागतात. पण काही वेळा आपल्या चुकीच्या सवयींमुळे त्वचेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच वाढत्या वयोमानानुसार काही मुला-मुलींच्या चेहऱ्यावर मुरुम, बारीक पुरळ येतात. ही समस्या शरीरातील हार्मोनमधील बदलामुळेही उद्भवते.

या व्यतिरिक्त बद्धकोष्ठता, त्वचेचे बॅक्टेरिया आणि औषधांच्या प्रतिक्रियेमुळे मुरुम आणि पुरळ देखील होऊ शकतात. या व्यतिरिक्त आपल्याला काही चुकीच्या सवयी आहेत, ज्यामुळे त्वचेच्या समस्या देखील उद्भवू शकतात, त्यामुळे या सवयी बदलणे खूप आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊयात……

अमेरिकन ऍकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजी असोसिएशनच्या मते, त्वचेवर येणारे मुरुम लहान आणि मोठे असे असू शकतात. यामध्ये तीव्र वेदनांसोबत काही वेळा रक्तही बाहेर येते. त्याच वेळी, त्वचेवर असलेल्या ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स यांना देखील पुरळ म्हणतात. तसेच मुरूमांच्या प्रकाराबद्दल बोलायचे झाल्यास, ब्लॅकहेड्स, व्हाइटहेड्स, पॅप्युल्स, नोड्यूल्स, सिस्टिक पिंपल्स असे काही प्रकार आहेत.

कमी पाणी पिणे

जी लोकं कमी पाणी पितात त्यांना त्वचेच्या समस्या जसे की मुरूमांच्या समस्यांचा सामना करावा लागतो. आरोग्य तज्ञ देखील दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी पिण्याची शिफारस करतात. यामुळे शरीरातील सर्व टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि त्वचा हायड्रेट राहते. नियमितपणे ३-४ लिटर पाणी प्यायल्याने त्वचेचा रंगही सुधारतो व मुरूम, पुरळ, डार्क सर्कल या समस्या देखील उद्भवत नाहीत.

चेहरा साबणाने धुणे

अनेकदा लोकं चेहरा धुण्यासाठी साबणाचा वापर करतात, मात्र त्यामुळे त्वचा कोरडी होते, त्यामुळे चेहऱ्यावर खाज येण्याची समस्या सुरू होते. साबणाची pH पातळी ९ ते ११ च्या दरम्यान असते आणि त्याचा त्वचेवर परिणाम होतो.

चुकीची स्कीन प्रोडक्टचा वापर करणे

अनेकदा काही महिला एकच ब्युटी प्रोडक्ट जास्तकाळ वापरतात. पण वाढत्या वयाबरोबर त्वचेचा पोतही बदलू लागतो. अशा परिस्थितीत त्वचेच्या प्रकारानुसार सौंदर्य उत्पादने वापरली पाहिजेत.

वारंवार चेहरा धुणे

जी लोकं आपला चेहर्‍याला वारंवार हात लावत असतात आणि धुतात त्यांना त्वचेच्या समस्या देखील होऊ शकतात. अशावेळी चेहरा वारंवार धुणे टाळावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पद्धतीने कमी करा मुरूमाची समस्या

बाजारात प्रामुख्याने लेसर उपचार आणि कॉस्मेटिक त्वचाविज्ञान उपचार उपलब्ध आहेत. या उपचारासोबत प्रतिजैविकेही दिली जातात. जेणेकरून त्यांच्यामुळे होणारा संसर्ग टाळता येईल. तसेच मुरुम कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे थेरपी उपलब्ध आहेत. त्वचाशास्त्रज्ञांच्या मते, ही थेरपी ६ ते ८ आठवड्यांची असते, परंतु काही प्रकरणांमध्ये यास १२ ते १८ आठवडे लागू शकतात.