इडली आणि राजमा हे भारतातील सर्वात लोकप्रिय खाद्यपदार्थ आहेत. मुळात राजमा हा उत्तर भारतीय पदार्थ मानला जातो आणि इडली हा दक्षिण भारतीय पदार्थ मानला जातो. परंतु त्यांची चव आणि त्यातील पौष्टिक पोषक घटकांमुळे ते इतर राज्यांमध्ये तितक्या आवडीने खाल्ले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का, जैवविविधतेला सर्वाधिक हानी पोहोचवणाऱ्या टॉप २५ खाद्यपदार्थांमध्ये या पदार्थांचा समावेश झाला आहे. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, पण भारतातील इटली, चणा मसाला, राजमासह चिकन जालफ्रेझी पदार्थांचा जैवविविधतेला सर्वाधिक हानी पोहोचवणाऱ्या पदार्थांमध्ये समावेश झाला आहे.

PLOS ONE या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात जगभरातील १५१ लोकप्रिय पदार्थ्यांचे विश्लेषण करण्यात आले, यानंतर शास्त्रज्ञांनी जैवविविधतेला हानी पोहचवणाऱ्या जगभरातील पदार्थांची नावे जाहीर केली. यात शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थांचा समावेश आहे. शास्त्रज्ञांच्या मते जैवविविधतेला सर्वाधिक हानी पोहोचवणारा पदार्थ म्हणजे स्पेनचा लेचाझो, हा पहिल्या स्थानी आहे. यानंतर ब्राझीलमधील चार मासांहारी पदार्थांचा क्रमांक येतो, तर भारतातील इडली सहाव्या तर राजमा सातव्या क्रमांकावर आहे. यात चणा मसाला आणि चिकन जालफ्रेझी या यादीतील इतर पदार्थ आहेत.

Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
pm narendra modi interview marathi (1)
Video: तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत नरेंद्र मोदींना थेट प्रश्न; उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले…
Mumbai Women Buys 19 Flats Worth 118 Crores In Malbar Hill
“बंगल्यासमोर बिल्डिंग बांधली, समुद्र कसा बघू?”, म्हणत दक्षिण मुंबईत १९ फ्लॅट्स विकत घेणारी ‘ती’ आहे तरी कोण?
priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”

संशोधनात असे दिसून आले आहे की, शाकाहारी पदार्थांमध्ये सामान्यतः मांसाहारी पदार्थांपेक्षा जैवविविधतेला हानी पोहोचवण्याचे प्रमाण कमी आहे. पण शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, तांदूळ आणि बीन्स असलेल्या पदार्थांमुळे जैवविविधतेचे जास्त नुकसान होत आहे जे फार आश्चर्यकारक आहे.

आलू पराठ्यापेक्षा इडली जास्त हानिकारक

या अभ्यासात फ्रेंच फ्राय हा जैवविविधतेचे सर्वात कमी नुकसान करणारा पदार्थ असल्याचे दिसून आले. तसेच बटाटा आणि गहू यांसारख्या पिष्टमय पदार्थांपासून बनवलेले पदार्थ, जसे की मंटू आणि चायनीज स्टीम्ड बन्स, जैवविविधतेचे सर्वात कमी नुकसान करणारे खाद्यपदार्थ आहेत. या यादीत भारतातील आलू पराठा ९६ व्या स्थानावर, डोसा १०३ व्या स्थानावर आणि बोंडा १०९ व्या स्थानावर आहे. हे संशोधन बरोबर मानले तर, आलू पराठ्यापेक्षा इडली निसर्गासाठी जास्त हानिकारक आहे, असे म्हणता येईल. या संशोधनातून भारतातील जैवविविधतेवर खूप जास्त दबाव किंवा वाईट परिणाम होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरमधील बायोलॉजिकल सायंसेजचे असोसिएट प्रोफेसर लुईस रोमन कॅरास्को, ज्यांनी संशोधनाचे नेतृत्व केले, ते म्हणाले की, भारतातील तांदूळ आणि बीन्सचा पर्यावरणावर होणारा मोठा परिणाम आश्चर्यकारक आहे. शास्त्रज्ञांच्या मते, खाद्यपदार्थांची निवड ही चव, किंमत आणि आरोग्यावर अवलंबून असते. पण जैवविविधतेवर परिणाम करणाऱ्या पदार्थ्यांवरील या अभ्यासानंतर लोकांना त्यांच्या खाद्यपदार्थांच्या निवडी अधिक पर्यावरणपूरक बनवण्यात मदत होऊ शकते.

हा अभ्यास समोर येण्याआधी, वाढत्या शेतीमुळे अधिवास नष्ट झाल्यामुळे जैवविविधतेचे नुकसान होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली होती. मागील अभ्यासांनी असा अंदाज लावला आहे की, सरासरी कुटुंबाचा अन्न वापर त्याच्या पर्यावरणीय प्रभावाच्या २० ते ३० टक्के आहे. कॅरास्को म्हणतात की, हे संशोधन आपण विशिष्ट पदार्थ खाऊन किती प्रजाती नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर पाठवत आहोत याची कल्पना देते.