‘पडवळ’ ही फळभाजी संपूर्ण भारतात आढळते. अनेकजण या भाजीकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष करतात. अनेकांच्या नावडत्या भाजींच्या यादीत पडवळ असलं तर नवल वाटायला नको. पण, या फळभाजीकडे कितीही दुर्लक्ष केलं तरी तिच्यामध्ये असलेल्या गुणधर्मांकडे कानाडोळा करून चालणार नाही. पडवळमध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, तंतूमय व पिष्टमय पदार्थ भरपूर प्रमाणात आहेत. विशेष म्हणजे त्वचाविकारांवर पडवळ परिणामकारक आहे.
पडवळाचे फायदे
– ज्यांना लठ्ठपणा आहे, अशा व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये नियमितपणे पडवळाचा वापर करावा. यामुळे वजन नियंत्रणात राहते.
– हृदयरोग, मधुमेह या आजारांवर पडवळ परिणामकारक आहे.
– छातीत धडधडणे, दुखणे अशा आजारांवरही पडवळ उपयोगी आहे.
– त्याचप्रमाणे त्वचेच्या विकारांवरही पडवळ फायदेशीर आहे. थंडीच्या दिवसात अनेक त्वचारोग बळावतात अशावेळी आहारात पडवळाचा आर्वजून सहभाग करावा.
– पडवळामुळे रक्तपुरवठाही सुरळीत होतो.
– पडवळ कृमीनाशक आहेत त्यामुळे कृमीच्या तक्रारी असल्यास पडवळाचा आहारात समावेश करावा.