वाढत्या प्रदूषणामुळे आणि त्वचेची योग्य काळजी न घेतल्यामुळे काहीजण सध्या मुरुम, पुरळ, सुरकुत्या आणि डागांच्या समस्येने त्रस्त आहेत.त्वचेशी संबंधित या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी बहुतेक लोकं वेगवेगळ्या प्रकारच्या ब्युटि प्रोडक्टचा वापर करतात. मात्र त्वचारोगतज्ज्ञांचा असा विश्वास आहे की काही घरगुती उपायांमुळे तुमच्या त्वचेच्या या समस्यांपासून सुटका मिळू शकतात. तर तुम्ही तुमच्या त्वचेच्या काळजीकरिता रोजच्या रुटिंगमध्ये महागड्या क्रीम ऐवजी ऑलिव्ह ऑइलचा समावेश करू शकतात. ऑलिव्ह ऑईल हे व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन के, लोह, ओमेगा -3 फॅटी एसिड आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असल्याने तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

ऑलिव्ह ऑईल केवळ तुमची त्वचा उजळवतेच, त्याचबरोबर मुरुम आणि सुरकुत्या यासारख्या समस्या दूर करते. निरोगी त्वचा मिळवण्यासाठी तुम्ही १/४ कप मध आणि १/३ कप दही हे २ चमचे ऑलिव्ह ऑइल घेऊन त्यामध्ये मिसळा. यानंतर ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर २० मिनिटे लावून ठेवा. नंतर कोमट पाण्याने तुमचा चेहरा धुवा. हा उपाय नियमितपणे केल्याने तुमची त्वचा निरोगी राहते.

कोरड्या त्वचेसाठी करा हे उपाय

ऑलिव्ह ऑइलमध्ये असलेले व्हिटॅमिन ई त्वचेला मॉइश्चराइझ करते. त्यामुळे तुमची त्वचा जर कोरडी आहे, तर तुम्ही कापसाच्या मदतीने ऑलिव्ह ऑईल चेहऱ्यावर आणि मानेवर चांगले लावा. १५ मिनिटे कोरडे केल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. असे केल्यानंतर केवळ तुमच्या त्वचेच्या समस्या दूर होत नाही, तर सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे होणारे नुकसान आणि प्रदूषणापासून तुमची त्वचा निरोगी राहते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेहर्‍यावर पडलेल्या सुरकुत्यांना करा दूर

वाढत्या वयाबरोबरच त्वचेवर सुरकुत्या पडणे या समस्या निर्माण होतात. त्यामुळे वृद्धत्वाच्या या लक्षणांमुळे चेहरा निस्तेज होतो. याकरिता तुम्ही तुमच्या दररोजच्या रुटीनमध्ये ऑलिव्ह ऑईल वापरल्यास या समस्यांपासून तुम्ही मुक्त होऊ शकतात. यासाठी दोन चमचे ऑलिव्ह ऑईलमध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि चिमूटभर मीठ मिसळा. नंतर ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावून मसाज करा. नंतर त्वचा धुवा.

तसेच तुम्ही मेकअप रिमूव्हर म्हणून ऑलिव्ह ऑईल देखील वापरू शकता.