भारतीय रेल्वे ग्राहकांसाठी अनेक टूर पॅकेजेस आणते. जेणेकरून लोकं वेळोवेळी भारतातील अनेक ठिकाणांना भेट देऊ शकतील. अशातच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि ‘देखो अपना देश’ अंतर्गत भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी आणखी एक टूर पॅकेज सादर केले आहे. ज्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लोकं मुंबई, गोवा, अजिंठा यासह अनेक खास ठिकाणांना भेट देतील. हा प्रवास पूर्ण १२ दिवस आणि ११ रात्रीचा असणार आहे. तसेच या प्रवासात हॉटेलमध्ये राहण्यासोबतच खाद्यपदार्थ आणि स्नॅक्स, प्रेक्षणीय स्थळांपर्यंत पोहोचवण्याची सुविधा रेल्वेकडून असणार आहे.

या ठिकाणांना द्याल भेट

IRCTC ने त्यांच्या या टूर पॅकेजमध्ये काही खास ठिकाणे ठेवली आहेत. ज्यामध्ये म्हैसूर, अजिंठा, मुंबई, स्टॅच्यू ऑफ युनिटी, हैदराबाद, रामुजी, हम्पी आणि गोवा यांचा समावेश आहे. तर त्रिवेंद्रम, कोल्लम, कोट्टायम, एर्नाकुलम टाउन, त्रिशूर, ओट्टापलम, पल्लकड आणि इरोड हे बोर्डिंग पॉइंट असतील. याशिवाय, प्रवास पूर्ण केल्यानंतर बोर्डिंग पॉइंट कन्नूर, कोझिकोड, शोरानूर, त्रिशूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, कोल्लम, त्रिवेंद्रम हे असणार आहे.

पॅकेजबद्दल महत्वाची माहिती

भारतीय रेल्वेने या टूर पॅकेजला इंडियन मॅगझिन ट्रॅव्हल असे नाव दिले आहे. ते २३ मे २०२२ पासून सुरू होईल आणि त्रिवेंद्रम येथून दुपारी १२.०५ वाजता निघेल. त्याचे प्रवाशांसाठी चार प्रकारचे वर्ग असणार आहे, जे कन्फर्म, बजेट, स्टँडर्ड्स, इकॉनॉमी आहेत. टूर पॅकेजची किंमत २१,१०० रुपये असेल.

यात कोणत्या सुविधा दिल्या जातील

आरामासाठी एसी रूमची व्यवस्था असेल.

स्टँडर्ड आणि इकॉनॉमी रूमसाठी नॉन एसी रूममध्ये रात्रीचा मुक्काम करण्यात येईल.

बजेट वर्गासाठी हॉल आणि धर्मशाळा येथे थांबण्याची व्यवस्था करण्यात येईल.

सकाळचा चहा, नाश्ता, जेवण, रात्रीचे जेवण आणि दररोज एक लिटर पाण्याची व्यवस्था केली जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुकिंग कशी करावी

बुकिंगसाठी तुम्ही IRCTC वेबसाइट irctctourism.com ला भेट देऊ शकता. याशिवाय तुम्ही प्रादेशिक कार्यालयातही बुकिंग करू शकता. तुम्हाला काही माहिती हवी असल्यास तुम्ही ८२८७९३२२२७ आणि ८२८७९३२३१९ या क्रमांकावर कॉल करू शकता.