Jasprit Bumrah : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला सोमवारी पुत्ररत्न प्राप्त झाले. बुमराहच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. बुमराहने स्वत: ट्विट करीत ही माहिती दिली.
जसप्रीत बुमराह हा सर्वांत वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. भारतासह जगभरात त्याचे अनेक चाहते आहेत. मेहनतीच्या जोरावर जसप्रीतने वयाच्या फक्त २९ व्या वर्षी भरपूर यश मिळवले. तुम्हाला माहिती आहे का या वेगवान गोलंदाजाच्या घराची किंमत किती आहे? आज आपण याविषयीच जाणून घेणार आहोत.

जसप्रीत बुमराह त्याच्या पत्नीसह मुंबईच्या लक्झरी अपार्टमेंटमध्ये राहतो. मीडिया रिपोर्टनुसार या घराची किंमत दोन कोटी रुपये आहे. त्याशिवाय अहमदाबादमध्येही बुमराहचे जवळपास तीन कोटींचे घर आहे.

Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Gold Hits All Time High, 2400.35 doller an Ounce, global market gold price, global market gold high, all time gold high in world, Global Economic Uncertainty , gold,finance news, finance article, marathi news, vietnam, america,
सोन्याची विक्रमी तेजीची दौड कायम, जागतिक बाजारात प्रति औंस २,४००.३५ डॉलरचा उच्चांक
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…

हेही वाचा : “…तरी मी सोडणार नाही चिकण मटण” नवऱ्यानं घेतला असा काही उखाणा; नवरीही लाजली अन् मग पाहुणेही…, व्हिडीओ एकदा पाहाच

बुमराह गोलंदाजी करताना आक्रमक दिसत असला तरी प्रत्यक्ष आयुष्यात तो खूप शांत आहे. तो घरी खूप आरामदायी असतो. बुमराहने घराच्या बाल्कनीमध्ये अनेक रोपटी लावली आहेत. या रोपट्यांची काळजी घेतानाचे बुमराहचे अनेक फोटो सोशल मीडियावर दिसून येतात. बुमराहच्या घरातील इंटिरियर डिझाईन खूप सुंदर आहे.
बुमराह फिटनेसच्या बाबतीत खूप सीरियस असतो. त्याने घरी वर्कआऊट करण्यासाठी एक खास जागा बनवली आहे. या ठिकाणी त्याने जिमचे साहित्य ठेवले आहे.

आता या घरात नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. जसप्रीतने त्याच्या बाळाचे नाव अंगद ठेवले आहे. मुलाच्या जन्माच्या एक दिवस आधी ३ सप्टेंबरला बुमराह आशिया कप सोडून भारतात परतला होता. तो असा अचानक परत आल्यामुळे अनेकांना धक्का बसला; पण त्यामागील खरे कारण ४ सप्टेंबरला समोर आले, जेव्हा त्याने स्वत: बाबा झाल्याचे सांगितले. सध्या सोशल मीडियावर लाखो चाहते बुमराहचे अभिनंदन करीत आहेत.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)