Kidney failure causes symptoms signs: सामान्यपणे लघवी होणे हे तुमचे मूत्रपिंड योग्यरीत्या कार्य करीत असल्याचे आणि शरीरातील विषाक्त पदार्थ आणि कचरा प्रभावीपणे काढून टाकत असल्याचे लक्षण आहे; परंतु मूत्रपिंड योग्यरीत्या कार्य करीत नसल्यास बहुतेकदा लघवीचा रंग, वास किंवा प्रवाहात बदल झाल्याचे दिसून येते. डॉक्टरांचा असा सल्ला आहे की, जर लघवी खूप गडद, खूप हलकी, फेसयुक्त किंवा सरळ एक प्रवाहात न राहता दुभंगून होत असेल, तर ती बाब सामान्य मानली जात नाही. अशी परिस्थिती मूत्रपिंडाचे कार्य कमी होणे, निर्जलीकरण, मूत्रमार्गात संसर्ग किंवा रक्तातील साखरेचे असंतुलन यांसारख्या आरोग्य समस्या दर्शवू शकते.
फेसयुक्त लघवी हे बहुतेकदा प्रथिनगळतीचे (प्रोटीन्युरिया) लक्षण असते, जे मूत्रपिंड फिल्टर (ग्लोमेरुली) करण्याच्या बाबतीत कमकुवत आणि रक्तातून प्रथिने फिल्टर करण्यास असमर्थ ठरत आहे. जळजळ किंवा दुर्गंधीयुक्त लघवी हे जीवाणूंच्या संसर्गाचे किंवा मूत्रमार्गाच्या संसर्गाचे (यूटीआय) लक्षण असू शकते. जर लघवी गुलाबी किंवा लाल दिसत असेल, तर त्याचा अर्थ लघवीमध्ये रक्त येणे, मूत्रपिंडात खडा वा खडे, संसर्ग किंवा एखाद्या गंभीर मूत्रपिंड आजाराची (हेमॅटुरिया) शक्यता असू शकते.
तज्ज्ञांच्या मते, सुस्थितीतील व्यक्तीला दिवसातून ६ ते ८ वेळा पारदर्शक, फिकट पिवळ्या रंगाची लघवी होते. परंतु, जर लघवीचे प्रमाण खूप कमी असेल, तर ते डिहायड्रेशन किंवा मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड झाल्याचे लक्षण असू शकते. बऱ्याचदा, लोक काळजीत पडतात, त्यांना वाटते की, फेसयुक्त लघवी हे मूत्रपिंडाच्या गंभीर समस्येचे लक्षण आहे. चला आपण डॉक्टरांना विचारूया की, फेसयुक्त लघवी खरोखर मूत्रपिंडाच्या नुकसान झाल्याचे लक्षण आहे का/
फेसयुक्त लघवी हे मूत्रपिंडाच्या नुकसानाचे लक्षण आहे का? ठाणे येथील किम्स हॉस्पिटलमधील कन्सल्टंट युरोलॉजिस्ट डॉ. अजित गुजेला स्पष्ट करतात की, फेसयुक्त लघवी हे नेहमीच मूत्रपिंडाच्या आजाराचे लक्षण नसते. त्यांनी स्पष्ट केले की, कधी कधी हे फक्त जास्त लघवीचा प्रवाह, निर्जलीकरण किंवा शौचालयात साबणाच्या साबणामुळे असू शकते. तथापि, जर फेसयुक्त लघवी वारंवार किंवा सतत येत राहिली, तर ते प्रथिनगळतीचे लक्षण असू शकते. याचा अर्थ असा की, मूत्रपिंडे फिल्टरेशनचे काम योग्य रीत्या करू शकण्यास समर्थ नाहीत आणि त्यासाठी तुम्हाला सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
फेसयुक्त लघवीची काळजी कधी करावी?
डॉ. गुजेला यांच्या मते, जर तुम्हाला एकाच दिवशी फेसयुक्त लघवीचा अनुभव आला, तर ते ठीक आहे. मात्र जर फेसयुक्त लघवी सलग अनेक दिवस राहिली तर ते चिंतेचे कारण आहे. तसेच, जर पाय, घोटे, हात किंवा डोळ्यांभोवती सूज येत असेल, थकवा येत असेल, लघवीचे प्रमाण कमी होत असेल, वजनात बदल होत असेल किंवा रंगात बदल होत असेल, तर अशा परिस्थितीत लघवीची चाचणी (प्रोटीन चाचणी) आणि किडनी फंक्शन चाचणी (क्रिएटिनिन, ईजीएफआर) करणे आवश्यक आहे. डॉ. गुजेला म्हणतात की, फेसयुक्त लघवीकडे दुर्लक्ष करू नका. ते मूत्रपिंडाच्या आजाराचे प्रारंभिक लक्षण असू शकते. वेळेवर चाचणी घेणे आणि हायड्रेशन राखणे हे मूत्रपिंडाच्या आरोग्याचे रक्षण करण्याचे सर्वोत्तम मार्ग आहेत.
कधी कधी फेसयुक्त लघवी होण्याची असू शकतात ही कारणे…
- जर तुम्ही पुरेसे पाणी प्यायला नाहीत, तर तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकते, ज्यामुळे तुमची लघवी जाड आणि फेसयुक्त होऊ शकते.
- मीठ आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने मूत्रपिंडांवर दबाव येतो.
- त्यामुळे रक्तदाब आणि साखरेची पातळी नियंत्रित ठेवा. ही दोन्ही मूत्रपिंडाच्या नुकसानीची प्रमुख कारणे आहेत.
- जास्त प्रथिनयुक्त आहार किंवा पूरक आहार घेतल्याने लघवीला फेस येऊ शकतो.
