विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या आयटीसी समूहाने जगातील सर्वात महागडं चॉकलेट (World’s Most Expensive Chocolate)सादर केलं आहे. कंपनीने आपल्या ‘फॅबल’ ब्रँड अंतर्गत हे चॉकलेट लाँच केलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयटीसीने आपला लग्जरी ब्रँड फॅबलच्या रेंजमध्ये ‘ट्रिनिटी ट्रफल्स एक्ट्राऑर्डिनेअर’ (‘Trinity – Truffles Extraordinaire’) नावाने हे चॉकलेट सादर केलं आहे. लाँच होताच या चॉकलेटची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली असून हे जगातील सर्वात महागडं चॉकलेट असल्याचं सांगितलं जात आहे.

या चॉकलेटची प्रति किलोग्रॅम किंमत तबब्ल 4.3 लाख रुपये इतकी आहे. ट्रिनिटी ट्रफल्स एक्ट्राऑर्डिनेअरच्या 15 ट्रफल्सचा (कँडी) बॉक्स एक लाख रुपयांमध्ये मिळेल. म्हणजेच एका कँडीची किंमत जवळपास 6667 रुपये आहे. प्रत्येक कँडीचं वजन 15 ग्रॅम असून हे चॉकलेट हाताने बनवलेल्या लाकडाच्या बॉक्समध्ये उपलब्ध असतील. यामध्ये 15 ग्रॅमची 15 ट्रफल्स असतील. या बॉक्सची किंमत सर्व करांसहित एक लाख रुपये असणार आहे.

“लग्जरी चॉकलेटच्या मार्केटमध्ये आम्ही देशातच नव्हे तर जगभरात ‘बेंचमार्क’ स्थापित केलाय, कारण आमच्या चॉकलेटचा समावेश गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाला आहे”, अशी प्रतिक्रिया आयटीसीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (फूड डिव्हिजन) अनुज रुस्तगी यांनी दिलीये.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Itc worlds most expensive chocolate earns a guinness record sas
First published on: 23-10-2019 at 13:07 IST