आजकाल तरुण, वृद्ध आणि लहान मुलांमध्येही जीन्सची मोठी क्रेझ पाहायला मिळते. त्यामुळे बाजारात वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या जीन्स बाजारात पाहायला मिळतात. बहुतांशी व्यक्तींना जीन्स वापरायला आवडण्यामागचे एक कारण म्हणजे ती सतत धुण्याचा त्रास नसतो. एकदा धुतल्यानंतर ती तीन ते चार दिवस सहज वापरू शकतो. तसेच घातल्यानंतर आरामदायक वाटते. म्हणूनच हल्ली लोक कुठेही जीन्स घालून जाणे पसंत करतात. परंतु, जीन्स धुताना काही चुका झाल्यास त्याचा रंग लवकर फिकट होऊ लागतो; ज्यामुळे जीन्स खूप जुन्या दिसू लागतात. त्यामुळे जीन्स धुताना खालील चार गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

वॉशिंग मशीनने नव्हे, तर हाताने धुवा

तुम्हाला जीन्स सतत धुऊन घालण्याची सवय असेल, तर ती नेहमी हाताने धुण्याचा प्रयत्न करा. जीन्स कधीही वॉशिंग मशीनमध्ये धुऊ नये. मशीनमध्ये जीन्स धुतल्यास त्याचे कापड लवकर फिके पडून खराब होते. पण, जीन्स हाताने धुतल्यास तिची चमक कायम राहील आणि ती दीर्घकाळ नवीन दिसेल.

गरम पाण्यात टाकू नका

हिवाळ्यात कितीही थंडी असली तरी जीन्स कधीही खूप गरम पाण्यात धुऊ नका. असे केल्यास तुमच्या जीन्सचा रंग फिका पडू शकतो; ज्यामुळे जीन्स अल्पावधीत जुनी दिसू लागते.

जीन्सवरील टॅग वाचा

जीन्स धुण्यापूर्वी त्याच्या आत असलेल्या टॅगवरील सूचना काळजीपूर्वक वाचा. त्यावर फॅब्रिकसंदर्भात संपूर्ण माहिती दिलेली असते; शिवाय ती कशी धुवायची याचीही माहिती लिहिलेली असते. त्यावरून तुम्हाला जीन्स कशी धुवायची याची कल्पना येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इस्त्री करणे टाळा

जीन्स दीर्घकाळ नवीन दिसावी, असे वाटत असेल, तर तरी सतत इस्त्री करणे टाळा, असे केल्याने तुमची जीन्स लवकर खराब होणार नाही. जर जीन्स जास्तच जुनी दिसत असेल, तर त्यावर एअर ड्रायर वापरू शकता.