आपल्या शरीराला योगासनांचा खूप फायदा होत असतो. योगामुळे शरीर केवळ अंतर्गतच नाही तर बाहेरूनही तंदुरुस्त राहते. योगासने लहान आणि प्रौढ माणसांसाठी चांगली आहेत. योग्य केल्याने मानसिक आरोग्य देखील चांगले राहते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी योगा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. लहानपणापासूनच मुलांना योग करायला लावला तर त्यांचे शरीर लवचिक राहण्यास मदत होते. योगासने केल्याने मुलांमध्ये चपळता राहते त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते.

योगाची उद्दिष्ट्ये आणि महत्त्व अनन्यसाधारण आहे. योगा हा प्रत्येकाच्या जीवनशैलीचा भाग असावा. खरंच लहान मुलांना योगाची आवश्यकता आहे का? मुले खेळताना अशी अनेक आसने करतात, जे प्रौढ आणि तरुण लोकांना करायला त्रास होतो. मुलांना योगासने खूप मदत करू शकतात. पिट्यूटरी ग्लँडद्वारे सोडले जाणारे हार्मोन्स थेट त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतात; ज्यामुळे मूड स्विंग, राग, चंचलपणा, बंडखोरी त्यांच्या वागण्या-बोलण्यातून दिसून येतो. आज आपण जाणून घेऊयात लहान मुलांसाठी कोणती सोपी योगासने आहेत. ज्यामुळे त्यांचे शरीर लवचिक राहील आणि तब्येत देखील चांगली राहील.

हेही वाचा : Yoga for Children : ५ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांनी करावे ‘हे’ तीन योगा; पालकांनो, फायदे जाणून घ्या

भुजंगासन

भुजंगासन या योगासनाच्या प्रकाराला कोब्रा पोज असे देखील म्हंटले जाते. भुजंगासन हा योग्य प्रकार करणे अगदी सोपे आहे. हे असणं करण्यासाठी तुम्हाला पोटावर झोपावे लागते. त्यानंतर हाताचे दोन्ही तळवे शरीराच्या दोन्ही बाजूला ठेवून पोटाचा वरचा भाग हवेत वर उचलावा लागतो. तर खालचे शरीर जमिनीवर राहते. भुजंगासन करताना डोके हे मागच्या बाजूला ठेवावे.

ताडासन

लहान मुलांसाठी ताडासन हा एक चांगला योगासनाचा प्रकार आहे. उंची वाढवण्यासाठी देखील ताडासन केले जाते. ताडासन करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा सरळ उभे राहावे. त्यानंतर हात वरती करून शरीर वरील दिशेने खेचावे. यावेळी पायाचे तळवे जमिनीवर स्थिर राहतात. आसन करत असताना हळूहळू श्वास घ्यावा आणि सोडावा. हे आसन काही वेळ केल्यानंतर पुन्हा सामान्य स्थितीमध्ये यावे.

हेही वाचा : त्वचा आणि केसांसाठी कोरफड व खोबरेल आहे फायदेशीर; होतात ‘हे’ फायदे

मार्जरी आसन

लहान मुलांच्या चांगल्या तब्येतीसाठी आणि शरीर लवचिक राहण्यासाठी मार्जरी आसन देखील एक चांगले आसन आहे. याला कॅट पोज असे देखील म्हटले जाते. हे योगासन करण्यासाठी गुडघे टेकवून जमिनीवर बसावे. यानंतर कंबर पुढील बाजूस वाकवून दोन्ही हाताचे तळवे जमिनीवर टेकवावेत. डोके देखील वाकलेले असावे. मनगट, कोपर आणि खांदे जमिनीच्या रेषेत सरळ वर असावेत. हे योगासन केल्यामुळे मंकय्याला आणि मानेला विशेष फायदा होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा. )