Kitchen Jugaad Hacks And Tricks: मिक्सर ग्राइंडर ही प्रत्येकाच्या स्वयंपाकघरातील एक महत्वाची वस्तू आहे. यामुळे कमी वेळात झटपट स्वयंपाक करता येतो. कारण मिक्सरच्या मदतीने काही मिनिटांत तुम्ही हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, कांदा यांची पेस्ट बनवू शकता, विविध प्रकारच्या डाळी दळू शकता, वाटण तयार करु शकता. परंतु, मिक्सरच्या भांड्यात कोणताही पदार्थ बारीक करताना काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे असते. कारण मिक्सरची मोटर आणि ब्लेड खराब होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला मिक्सर बराच काळ व्यवस्थित वापरण्यायोग्य ठेवायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. यासाठी मिक्सरमध्ये काही पदार्थ वाटणं टाळलं पाहिजे.

मिक्सरमध्ये चुकूनही वाटू नका ‘हे’ ५ पदार्थ (Kitchen Jugaad)

१) हळकुंड

कच्ची हळद म्हणजे हळकुंड मिक्सरमध्ये वाटल्यास मिक्सरची मोटर आणि ब्लेडचे नुकसान होऊ शकते. कारण हळकुंड खूप कडक असतात, त्यामुळे ते बारीक करताना मिक्सरच्या मोटरवर जास्त दाब पडतो; ज्यामुळे मोटर जळण्याचा धोका वाढतो. तुम्ही पारंपरिक पाटा- वरवंट्यावर हळद बारीक करू शकता किंवा प्रोफेशनल ग्राइंडर वापरू शकता.

What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
bhakri
भाकरी थापताना नेहमी मोडते, भाजताना चिरते का? टेन्शन घेऊ नका; टम्म फुगलेली मऊसूत ज्वारीची भाकरी बनवा, फक्त या सोप्या टिप्स वापरून पाहा
Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
Car blast protection avoid putting these things in your car boot trunk car safety tips
चक्क बॉम्बसारखी फुटेल कारची डिकी; गाडीत ‘या’ गोष्टी ठेवत असाल, तर सावधान! एक छोटीशी चूक पडेल महागात
way of chopping and cleaning methi leaves
मेथीची भाजी खायला आवडते; पण साफ करायचा कंटाळा येतो? मग ‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने भाजी चुटकीसरशी करा साफ
These simple tips will help to make a delicious food
जेवण बनवताना खूप धावपळ होते? ‘या’ सोप्या टिप्स रूचकर जेवण बनवण्यासाठी करतील मदत
Why You Should Avoid Reheating Rice - Expert's Warning Reheating rice cause food poisoning
महिलांनो रात्री शिल्लक राहिलेला भात सकाळी पुन्हा गरम करून खाता का? ‘हे’ गंभीर परिणाम ऐकून धक्का बसेल

२) बदाम, अक्रोड, काजू असे ड्रायफ्रूट्स

बदाम, अक्रोड, काजू असे बियायुक्त पदार्थ मिक्सरमध्ये बारीक केल्यास ब्लेडचे नुकसान होऊ शकते, हे पदार्थ कडक असल्याने ब्लेडची धार कमी होऊ शकते. मिक्सरच्या मोटरवर अधिक ताण येतो, त्यामुळे ड्रायफ्रूट्ससाठी मिक्सर वापरण्याऐवजी ते हलके भिजवून त्याचे छोटे तुकडे करून बारीक करा.

३) दालचिनी आणि लवंगा

दालचिनी, काळी मिरी आणि लवंगा यांसारखे कडक मसाले मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्याने ब्लेड आणि जार दोन्ही खराब होऊ शकते. हे मसाले कडक असल्याने बारीक करताना मोटारीवर अधिक दाब येतो आणि ब्लेड लवकर तुटतात, त्यामुळे हे मसाले मिक्सरमध्ये वाटण्याआधी त्याचे लहान तुकडे करून हलके तळा आणि मग वाटून घ्या.

४) गरम पदार्थ आणि सूप

मिक्सरमध्ये गरम पदार्थ बारीक करताना मिक्सरच्या जारमध्ये दाब निर्माण होतो, ज्यामुळे मिक्सरचे झाकण उडू शकते. याशिवाय गरम पदार्थामुळे मिक्सरच्या जारच्या प्लास्टिक कोटिंगचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे मिक्सरमध्ये गरम पदार्थ किंवा सूप थंड झाल्याशिवाय वाटू नका.

५) बर्फाचे मोठे तुकडे

बर्फाचे मोठे तुकडे मिक्सरमध्ये वाटताना ब्लेड आणि जार तुटून खराब होऊ शकतो. बर्फाच्या कडकपणामुळे मिक्सरचे ब्लेड बोथट होऊ शकतात आणि तुटू शकतात. अशा स्थितीत बर्फाचे छोटे तुकडे करून मगच ते मिक्सरमध्ये टाका.

मिक्सर वापरताना घ्या ही काळजी

  • मिक्सरमध्ये कोणताही पदार्थ बारीक करताना आधी त्या पदार्थांचे लहान तुकडे करा.
  • मिक्सर पुन्हा पुन्हा ओव्हरलोड करू नका.
  • ब्लेड्स वेळोवेळी स्वच्छ करा आणि त्याची धार आहे की नाही तपासत रहा.
  • मोटार जास्त गरम होऊ नये म्हणून मिक्सर जास्त वेळ सतत चालवू नका.
  • मिक्सरमध्ये फक्त तेच पदार्थ वाटून घ्या, ज्यासाठी तो मिक्सर डिझाइन केला आहे.

Story img Loader