Kitchen Jugaad : टोमॅटो हा पौष्टिक गुणयुक्त आहारीय पदार्थ आहे. अनेकदा टोमॅटोचे भाव वाढतात अशावेळी टोमॅटो विकत घ्यावा की नाही, अशी परिस्थिती येते. अनेकांना असे वाटते की कांद्याप्रमाणे टोमॅटो जास्त दिवस साठवून ठेवता येत नाही. तीन चार दिवसानंतर टोमॅटो खराब होतात. त्यामुळे गरजेनुसार हे लोकं टोमॅटो विकत घेतात पण खरंच टोमॅटो जास्त दिवस साठवून ठेवता येत नाही का? टेन्शन घेऊ नका, टोमॅटो एका खास पद्धतीने साठवून ठेवता येऊ शकते. २० -२५ दिवस नाही तर तब्बल तीन महिने तुम्ही टोमॅटो साठवून ठेवू शकता. त्यासाठी ही ट्रिक तुम्हाला जाणून घ्यावी लागेल.

युट्यूबवर एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दीर्घकाळ टोमॅटो ताजे ठेवण्याची एक ट्रिक सांगितली आहे.व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे –
सुरुवातीला एका भांड्यात स्वच्छ पाणी घ्या त्यानंतर त्यात मीठ आणि हळद घाला. त्या पाण्यात टोमॅटो टाका. तीस मिनिटे हे टोमॅटो असेच ठेवा. तीन मिनिटानंतर हे टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर हे टोमॅटो चांगल्याने पुसून घ्या. प्रत्येक टोमॅटोभोवती न्यूजपेपर गुंडाळा. न्यूजपेपरनी पूर्णपणे टोमॅटो झाकून घ्या. सर्व न्यूजपेपरनी झाकलेले टोमॅटो एका टोपलीत ठेवा आणि टोपली एका बंद कपाटात ठेवा. काळजी घ्या या टोमॅटोवर तीन महिने सूर्यप्रकाश पडू नये.
आठवड्यातून एकदा या टोमॅटोवरील न्यूजपेपर काढून बघा आणि त्यातील पिकलेले टोमॅटो वापरायला घ्या. टोमॅटो पिकले की ते इथलिन गॅस तयार करतात या गॅसमुळे इतर टोमॅटोंवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. हे पिकलेले टोमॅटो तुम्ही फ्रिजमध्ये ठेवून वापरू शकता.

हेही वाचा : Kitchen Jugaad : कांदा महाग झाला तरी टेन्शन नाही! आता वर्षभर घरच्या घरी साठवा कांदे, ही ट्रिक वापरा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ezy2Learn या युट्यूब अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान ट्रिक. धन्यवाद” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान आयडिया आहे. मला खूप आवडली” या अकाउंटवर असे अनेक घरगुती जुगाडचे व्हिडीओ दिलेले आहेत.