Kitchen jugad video: गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. एका गृहिणीने आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. गृहिणींनो तुम्ही कधी उकळत्या पाण्यात चहाचे कप टाकले आहेत का? आता तुम्ही म्हणाल चहाचे कप उकळत्या पाण्यात का ? मात्र थांबा याचा मोठा फायदा आहे. तुम्हाला हा उपाय जितका विचित्र वाटतो आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त तो फायद्याचा आहे. मात्र, नेमकी कमाल काय होते हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चला तर पाहूयात यामुळे नेमकं काय होतं.
आपल्या सर्वांनाच माहिती आहे, चहाचे कप कितीही वेळा नवीन आणा पण ते तुटतातच. कधी धुताना तुटतात तर कधी असेचही तुटतात.
किचनची खरी मालकीण घरातील गृहिणी असते. तिला सर्व गोष्टी बरोबर माहिती असतात आणि ती प्रत्येक गोष्टीवर बरोबर उपाय शोधत असते. असाच एक उपाय एका गृहिणीनं दाखवला आहे. ही ट्रिक वापरून तुमचे कप अधिक मजबूत होतील आणि सहजासहजी फुटणार नाहीत. चला तर मग, ही भन्नाट ट्रिक काय आहे आणि कशी वापरायची, ते पाहूया.. बाजारातून खरेदी केलेले नवे कोरे कप वापरण्यापूर्वी त्यांना किमान पाच मिनिटं उकळत्या पाण्यात गरम करा. त्यामुळे कपांची मजबुती वाढते, असा दावा या व्हिडीओतील महिलेनं केला आहे. पण एक महत्त्वाची सूचना म्हणजे ही ट्रिक फक्त चिनी मातीच्या कपांवरच काम करते. मात्र आपल्या पैकी जवळपास प्रत्येकाच्या घरात चिनी मातीचेच कप असतात, त्यामुळे ही ट्रिक वापरण्यात काहीच हरकत नाही.
पाहा व्हिडीओ
chanda_and_family_vlogs इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.