Kitchen jugad video: भारतीय महिलांकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय.

सुरूवातीच्या काळात टिव्ही, फ्रिज, मशिन्स यांसारखे अप्लायंसेस प्रत्येक घरात नसायचे. आता लोकांच्या घरी वॉशिंग मशिन, मायक्रोव्हेव्ह, ओव्हन किवा एअर फ्रायर टोस्टरसुद्धा असतो. याव्यतिरिक्त रूम हिटर, एसीची सुद्धा आवश्यकता असते. वाढतं लाईटबील बघून अनेकांना टेंशन येतं. मात्र ते कशामुळे येतं याचा आपण कधी विचार करत नाही. मात्र थांबा आता काळजी करु नका कारण एका महिलेनं लाइट बिल कमी करण्यासाठी भन्नाट जगाड दाखवला आहे. तुम्ही कधी घरातल्या स्विच बोर्डवर गोळ्यांचं पॅकेटचा वापर केलाय का? तुम्हाला जर वीज बचत करायची असेल तर तुम्ही काही गोष्टीत बदल करू शकतात. तुम्हाला दर महिन्यातील विजेचे बिल कमी येईल.एका गृहिणीने या जबरदस्त किचन जुगाडाचा व्हि़डीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. जो व्हायरल होतो आहे. जर तुम्हाला दर महिन्याला विजेचे बिल भरमसाठ येत असेल तर तुम्ही या ठिकाणी दिलेल्या काही ट्रिक्सचा वापर करून वीज बिल कमी करू शकता.

घराची साफसफाई व्यवस्थित केली तर घरात लक्ष्मीचा वास होतो असे मानतात. पण घरातील छोट्या छोट्या ठिकाणाची सफाई करणे खूप मोठी गोष्ट आहे. पण बरेच लोक आपले घर स्वच्छ करतात परंतु स्विच बोर्ड साफ करताना विसरतात. काही लोक आहेत ज्यांना स्वीच बोर्ड साफ करताना विजेचा धक्का बसण्याची भीती असते.तुम्हीही दिवाळीत तुमच्या घरातील स्विच बोर्ड साफ करण्याचा विचार करत असाल तर हा लेख फक्त तुमच्यासाठी आहे. या व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला संपलेल्या गोळ्यांचं पाकीट घेऊन त्याचा थोडा भाग कापून त्याच्या मदतीने तुम्ही स्विच बोर्डवरचे डाग घाण सहज स्वच्छ करु शकता. आता तुम्ही म्हणाल याचा आणि लाईट बिल कमी होण्याचा काय संबंध? तर बऱ्याचदा स्विच बोर्डमध्ये अडकलेल्या घाणीमुळे बटणं अर्धवट चालू बंद होतात त्यामुळे लाईट बिल वाढत जातं. अशावेळी जर स्विचमधल्या अवघड जागेतील घाण आपण काढू शकलो तर तुम्ही या समस्येवर मात मिळवू शकता.

पाहा व्हिडीओ

तुम्हीही हे पाहून अवाक् व्हाल. बऱ्याच वर्षांपासून असलेलं तुमचं टेन्शन या जुगाडामुळे नक्कीच कमी होईल. एका गृहिणीने हा जुगाड दाखवला हे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.