आपण बाजारातून बिस्किटे आणि कुकीज विकत घेतो आणि दोन दिवसात ते हवेच्या संपर्कात आल्यानंतर नरम होतात. असे अनेकदा आपल्या सोबत होतं. यामुळे त्यांची चव तर बिघडतेच आणि नरम झालेली बिस्किटांची खाण्याची सगळी मजाही निघून जाते. अशा परिस्थितीत नरम झालेली सगळी बिस्किट फेकून देण्याचे देखील मन होत नाही. तर यावेळी काय करावे हे सुचत नाही. तेव्हा तुम्ही काही ट्रिक्स आणि टिप्सच्या मदतीने नरम झालेली बिस्किटे पुन्हा क्रिस्पी बनवू शकता. तर जाणून घेऊया हे कोणते उपाय आहेत.

अशा प्रकारे बिस्किटे आणि कुकीज क्रिस्पी करा

मायक्रोवेव्हचा करा वापर

जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर तुम्ही हे काम अगदी सहजरित्या करू शकतात. बिस्किटे आणि कुकीज पुन्हा क्रिस्पी करण्यासाठी तुम्हाला फक्त १८० डिग्री सेल्सियसवर मायक्रोवेव्ह प्री-हिट करून बिस्किट्स मायक्रोवेव्ह मध्ये ठेवा. यानंतर १ ते २ मिनिटांनी बाहेर काढून थंड करत ठेवा. थंड झाल्यावर बिस्किट क्रिस्पी होतील.

तव्यांचा करा वापर

नरम झालेले बिस्किट पुन्हा क्रिस्पी करण्यासाठी तुम्ही गॅसवर तवा किंवा कोणतेही नॉनस्टिक पॅन ठेवा आणि ते गरम झाल्यावर त्यावर सर्व बिस्किटे ठेवा. लक्षात ठेवा की गॅसची ज्योत मंद असावी. सुमारे २ ते ३ मिनिटे गरम केल्यानंतर त्यांना फ्लिप करा. त्यानंतर बिस्किट पूर्वीसारखीच खुसखुशीत आणि क्रिस्पी होतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा पद्धतीने करा स्टोअर

तुम्ही बाजारातून आणलेले बिस्किट आणि कुकीज नरम खाऊ नये या करिता तुम्ही हे बिस्किट व कुकीज रूमच्या टेंपरेचर नुसार ठेवा. तसेच या व्यतिरिक्त तुम्ही हे कुकीज आणि बिस्किट्स हवा बंद डब्यात ठेवा. जर तुम्ही त्यांना एकदा बाहेर किंवा खूप थंड ठिकाणी ठेवले असेल तर हा डब्बा फ्रीजमध्ये ठेवा. हे देखील लक्षात ठेवा की एका डब्यामध्ये वेगवेगळी बिस्किटे किंवा कुकीज ठेवणे टाळा.