scorecardresearch

Premium

Kitchen Jugaad: रात्री झोपण्याआधी फक्त एकदा फ्रिजमध्ये तुटलेली बांगडी ठेवा; सकाळी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Viral video: फ्रिजमध्ये बांगडीने काय चमत्कार केला ते तुम्हीच पाहा.

kitchen tips in marathi bangles used in fridge
बांगडीचा फ्रिजमध्ये अनोखा असा वापर एका गृहिणीने दाखवला आहे (फोटो: युट्युब/ @Puneritadkaवरून साभार)

How To Save Electricity Bill Through Fridge: हिवाळा सुरू झाला आहे. परंतु, अनेकांचे लाइट बिल कमी झाले नाही. अनेकांना उन्हाळ्याच्या दिवसाप्रमाणेच वीज बिल येत आहे. तुम्हाला जर वीज बचत करायची असेल तर तुम्ही काही गोष्टीत बदल करू शकतात. तुम्हाला दर महिन्यातील विजेचे बिल कमी येईल.एका गृहिणीने या जबरदस्त किचन जुगाडाचा व्हि़डीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. जो व्हायरल होतो आहे. जर तुम्हाला दर महिन्याला विजेचे बिल भरमसाठ येत असेल तर तुम्ही या ठिकाणी दिलेल्या काही ट्रिक्सचा वापर करून वीज बिल कमी करू शकता. जाणून घ्या डिटेल्स.

बांगडीचा फ्रिजमध्ये अनोखा वापर

Narendra Modi wished Mohammed Shami his best for recovery from heel surgery
Mohammed Shami : ”तुम्ही या दुखापतीवर धैर्याने…”, शमीच्या शस्त्रक्रियेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत दिला धीर
balmaifal, cat, love, kittens, story, memory, kids, child, mother,
बालमैफल : मांजरीचं प्रेम..
Angry husband danced in such a way that his wife would never forget for rest of her life
VIDEO: जबरदस्ती नाच म्हणाल्यामुळे नवरदेवाला आला राग, रागावलेल्या नवऱ्यानं केलं असं काही की…नेमकं काय घडलं?
man dies while smile surgery
मोहक हास्यासाठी केलेली शस्रक्रिया बेतली जीवावर; विवाहाआधी वरानं गमावले प्राण!

गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय. आतापर्यंत तुम्ही महिलांच्या श्रृगांराचा एक भाग म्हणून बांगड्या घतल्या असतील. पण हीच बांगडी तुमचं लाइट बिल कमी करू शकतो, याचा तुम्ही कधी विचारही केला होता का? किचन जुगाडा चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

बांगडी एका विशिष्ट पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवल्यास तुमचं लाइट बिल कमी होईल, ते कसं हे जाणून घेऊयात. तर यासाठी तुम्हाला फक्त काही बांगड्या लागणार आहेत. या बांगड्यांचं करायचं काय तर…सर्वात आधी ५ ते ६ बांगड्या घ्या. आणि फ्रिजरमध्ये या बांगड्या पसरवून घ्या. यामुळे एरवी फ्रिजमध्ये साचत असलेला बर्फ साचणार नाही. दोन दिवसातून एकदा हा उपाय करा, असा सल्ला या महिलेने दिला आहे. यामुळे वीज बिल कमी होतं, असा दावा या महिलेने व्हिडीओत केला आहे. असं केल्यानं फ्रिजमध्ये बर्फ साठणार नाही, आणि विजेचे बिलही कमी येईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> तव्यावर एक लसूण फिरवून मग करा अंड्याचं हाफ फ्राय; परफेक्ट जुगाड वाचवेल तुमचा वेळ, पाहा Video

@Puneritadka युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kitchen tips in marathi bangles used in fridge kitchen jugaad trending video viral srk

First published on: 03-12-2023 at 11:19 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×