Kitchen Jugaad Video: कोणतीही भारतीय थाळी चपातीशिवाय अपूर्ण आहे. चपाती बनवणे देखील एक कला आहे. सुरुवातीला चपाती करताना ती मऊ व गोल आकाराची होईलच असे नाही. ती अनेकदा कडक व जाडसर तयार होते. तसेच अनेक महिलांना चपात्या करायला बराच वेळ लागतो. महिला वारंवार चपातीपेरक्षा भाकरी लवकर होते असं म्हणतात. पण आता टेन्शन घेऊ नका. तुमच्या चपात्या लवकर होण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक उपाय घेऊन आलो आहोत. यासाठी तुम्हाला फक्त एक जुना चार्जर लागणार आहे. मोबाईल चार्जरचा जबरदस्त असा उपयोग एका गृहिणीने दाखवला आहे. या किचन जुगाडा चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
चपाती बनवताना चार्जरचा असा वापर तुम्ही विचारही केला नसेल
गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय. पीठ मऊ मळले गेल्यानंतर, या कणकेच्या चपात्या सॉफ्ट व टम्म फुलतात. यासह या चपात्या अधिक काळ मऊ व नरम राहतात. सकाळी ऑफिस व शाळेत जाणाऱ्यांची घाई असते, अशा स्थितीत जर आपल्याला झटपट व सॉफ्ट चपात्यांसाठी कणिक मळायचे असेल तर, ही ट्रिक फॉलो करून पाहा. पण तरी जुना चार्जरचा वापर करून चपाती कशी बनवायची असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आता ते तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यावरच समजेल.
चपाती बनवताना जुन्या चार्जरची कमाल
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. एक जुना चार्जर घ्या त्याची वायर कापून घ्या. व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे चार्जरच्या वायरचे छोटे तुकडे करा. तुम्हाला माहितीच आहे, पोळपाट कितीही महागड घ्या चपात्या करताना ते स्थीर राहतच नाही. सारखं हलते किंवा घसरते यामुळे चपात्या करण्यात जास्त वेळ जातो. मात्र हा जुगाड केल्यावर पुन्हा कधीच तुम्हाला याचा त्रास होणार नाही. वर सांगितल्याप्रमाणे चार्जरच्या वायरचे तुकडे पोळपाटाच्या मागील बाजूला जे चार पाय असताता त्याला लावायचे आणि खिळ्यानं किंवा फेविकॉलनं चिटकवायचे. असं केल्यानं पोळपाट जागेवरुन जराही हलणार नाही.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Kitchen Jugaad: वॅसलिनमध्ये कॉलगेट टाकताच कमाल झाली! Video पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
@Puneritadka युट्यूब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.